आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवारी 23 वा जी-सॅट 14 उपग्रह अवकाशात झेपावणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - येत्या पाच जानेवारी रोजी आपला 23 वा जी-सॅट 14 उपग्रह अवकाशात झेपावणार आहे. या उपग्रहाला जीएसएलव्ही डी 5 प्रक्षेपकाचा उपयोग करण्यात येणार असून यामध्ये स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आले आहे. उड्डाणासाठी 29 तासांची उलटगणती शनिवारी सकाळी 11 वाजता सुरु होणार आहे. रविवारी दुपारी 4 वाजून 16 मिनीटांनी र्शीहरीकोटा अंतराळ स्थानकावरुन हे उड्डाण होणार आहे. लाँच ऑथरायजेश बोर्डने या प्रक्षेपणासाठी 28 डिसेंबर रोजी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो)ला परवानागी दिली होती.
जीएसएलव्ही रॉकेटची लांबी 49.13 मीटर असून क्रायोजेनिक इंजिन रॉकेटच्या तिसर्‍या टप्यात उपयोगात आणले जाणार आहे. हे रॉकेट 1982 किलो वजनाचे आहे. जी-सॅट उपग्रह पुढील 12 वर्ष काम करणार आहे. उड्डाणानंतर हा उपग्रहाचा देशातील नऊ जियोसिंक्रोनाइज्ड उपग्रहात समावेश होणार आहे.
19 ऑगस्ट 2012 : उड्डाणापूर्वी केवळ दोन तास आधी इंधन यंत्रणेत बिघाड झाल्याने उड्डाण ऐनवेळी रद्द. त्यामुळे मोहीम पुढे ढकलली.
15 एप्रिल 2010 : जीएसएलव्ही डी3 मध्ये ही स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आले होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ते समुद्रात पाडण्यात आले.