आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक: तामिळनाडूत ३५२ स्तनपान केंद्रे सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- सतत प्रवासात असणाऱ्या मातांच्या नवजात शिशूंच्या स्तनपानासाठी तामिळनाडूत "स्तनपान केंद्रे' सुरू करण्यात आली आहेत. राज्यातील ३५२ बसस्थानकांवर सुरू करण्यात आलेल्या या सुविधेचा शुभारंभ तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केला.

जागतिक स्तनपान दिनाच्या मुहूर्तावर त्यांनी राज्यातील ७ शासकीय रुग्णालयांमध्ये "मिल्क बँक'सुद्धा सुरू केल्या. दरवर्षी १ ते ७ ऑगस्टदरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह आयोजित केला जातो. महिलांना सार्वजनिक स्थळी आपल्या बालकांना स्तनपान करण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही योजना सुरू केली आहे.

दुधावर प्रक्रिया
मिल्क बँकेतील आवश्यक उपकरणांसाठी तामिळनाडू सरकारने प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत दिली आहे. या बँकेत मातेकडून दान देण्यात आलेल्या दुधावर प्रक्रिया करून ते तीन महिन्यांपर्यंत सुरक्षित ठेवले जाईल. नंतर ते आवश्यक व गरजू बालकांसाठी उपलब्ध करून दिले जाईल.
"ब्रेस्टफीडिंग अँड वर्क लेट्स मेक इट वर्क'
१ ते ७ ऑगस्टदरम्यान दरवर्षी जागतिक स्तनपान आठवड्याचे आयोजन केले जाते. "ब्रेस्टफीडिंग अँड वर्क लेट्स मेक इट वर्क' अशी यंदाच्या स्तनपान आठवड्याची थीम आहे. श्रमिक महिला आणि त्यांच्या बालकांना येणाऱ्या अडचणींपासून सुटका करून देण्यासाठी ही थीम आहे.

सात रुग्णालयांत मिल्क बँका
तामिळनाडूतील सात शासकीय रुग्णालयांमध्ये मुख्यमंत्र्यांनी "मिल्क बँक' सुरू केल्या आहेत. यात तिरुचिरापल्ली, मदुराई, कोइम्बतूर, थेनी, सालम आणि थन्जावूर यांच्यासह इग्मोर येथील १६० वर्षे जुन्या रुग्णालयाचाही समावेश आहे. यापूर्वीच तामिळनाडूच्या इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ अँड हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनमध्ये ही योजना सुरुवात करण्यात आलेली आहे.
बातम्या आणखी आहेत...