आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळमध्ये अजूनही होतात 37% बालविवाह; अपत्यासाठीही कुटुंबाचा दबाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू- नेपाळ बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलत नाही. प्रत्येकी तीनपैकी एका मुलीचा विवाह येथे वयाच्या १८ व्या वर्षापूर्वीच होतो. जागतिक मानवाधिकार आयोगाने याविषयीचा अहवाल सादर केला.

बालविवाह हा नेपाळच्या कायद्यानुसार गुन्हा आहे. मात्र या कायद्याची अंमलबजावणी प्रभावी होत नाही. वर्ष २०२० पूर्वी बालविवाहची पद्धत पूर्णपणे बंद करण्याचे उद्दिष्ट सरकारने जाहीर केले होते. मात्र सद्य:स्थिती पाहता २०३० पर्यंत हे साध्य होण्याची शक्यता नसल्याचे चित्र आहे.

वरिष्ठ महिला हक्क संशोधक हेथर बार यांनी नेपाळच्या बालविवाहाचा अहवाल सादर केला. अनेक मुलांचे मुलींचे भविष्य त्यांच्या हातीच ठेवले जात नाही. वेळेपूर्वी विवाह झाल्याने त्यांना संधीच नाकारली जात असल्याचे हेथर म्हणतात. नेपाळच्या ग्रामीण शहरी भागातील स्थिती यासंबंधी समान आहे.

शिक्षणाच्यासंधीचा अभाव : हाअहवाल बालविवाह झालेल्या दांपत्यांच्या मुलाखती घेऊन तयार करण्यात आलाय. मुलींना एका वयानंतर शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येते. कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाणही अधिक आहे. विवाह झाल्यानंतर मुलीचे शरीर परिपक्व होण्यापूर्वीच पहिल्या अपत्यासाठी अट्टहास केला जातो.

गरिबीमुळे नकारही देणे अशक्य
मानवाधिकारआयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार ३७% मुलींचे ११% मुलांचे विवाह १८ व्या वर्षापूर्वीच होतात. मुलांचे विवाहाचे वय कायद्यानुसार २० आहे. अनेकांचे त्यांच्या मर्जीविरुद्ध विवाह होतात. गरिबी नकाराचा पर्याय नसल्यानेही अनेक विवाह लावले जातात. मनासारखा जोडीदार हवा म्हणून अनेक मुली किशोरवयातच पळून जाण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडतात. १६ वर्षीय सुनीता लाम नामक मुलीने माझे कुटुंबीय लग्नासाठी आग्रही असल्याने आलेली स्थळे पसंत नसल्याने आपण पळून जाऊन लग्न केल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...