आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 37000 Page Chargesheet Against Isis Twitter Handler Mehdi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात राहुन सीरियात घुसण्याचा मार्ग सांगत होता ISIS चा ट्विटर हँडलर मेहदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु - कुख्यात दहशतवादी संघटना आयएसआयएस साठी ट्विटर हँडल चालवण्याच्या आरोपात सहा महिन्यांपूर्वी अटक करण्यात आलेल्या मेहदी मसरुर बिस्वास विरोधात सेंट्रल क्राइम ब्रँचने 37 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात म्हटले आहे, की तो भारतात बसून आयएसआयएस जॉइन करण्यासाठी परदेशातील तरुणांना मदत करत होता.
मेहदी मसरुरवर आरोप आहे, की त्याने त्याने तुर्कीची सीमा कशी ओलांडायची आणि सीरियामध्ये आयएसआयएसच्या हेडकॉर्टरला कसे पोहोचायचे याची माहिती देत होता.
मसरुरच्या ट्विटर हँडलवरुन त्याचे स्वतःचे आणि त्याच्या 18 हजार फॉलोअर्सने 1लाख 22हजार ट्विट्स आणि रिट्विटस केले होते. त्याआधारावर त्याच्यावर देशाविरुद्ध युद्ध पुकारणे आणि दहशतवादाला पुरक काम करण्यासंबंधीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मेहदी मसरुरने केलेल्या दहशतवादी कारवायांसाठी त्याच्याविरोधात खटला चालवण्याची केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.