पाटणा - पाटण्यातील गांधी मैदानावर रावणदहनानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे ३८ लोकांचा मृत्यू झाला. त्यात २० महिला आणि ६ मुलांचा समावेश आहे. शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या उपस्थितीत ६० फूट उंच रावणाच्या पुतळ्याचे दहन झाले. या वेळी सुमारे पाच लाख लोक उपस्थित होते. दहनानंतर लोक एक्झिबिशन रोडकडे जात असताना चेंगराचेंगरी झाली. प्रचंड गोंधळ उडाल्याने महिला आणि मुले खाली पडली. त्यांना तुडवत लोक सैरावैरा पळत सुटले. यानंतर मैदानापासून ५०० मीटर अंतरापर्यंत लोकांच्या चपला-बूट इतस्तत: विखुरलेले होते. मुख्य प्रवेशद्वारावर एवढी गर्दी झाली की त्यामुळे महिला-मुले चेंगरली आणि त्यांचा मृत्यू झाला, असे जिल्हाधिकारी मनीष वर्मा यांनी सांगितले.
पाटण्यात हाहाकार
रावणाचे दहन होताच लोक मुख्य प्रवेशद्वाराकडे वळले. तेवढ्यात विजेची हायटेन्शन तार तुटल्याची अफवा पसरली आणि लोक पळत सुटल्याने चेंगराचेंगरी झाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, रावनदहनानंतरचा हाहाकार... आणि चेंगराचेंगरी होण्यापूर्वीचे फोटो....