आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाममध्ये पुराचा कहर, 1 लाख नागरिक बेघर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी - ब्रह्मपुत्रेसह तिच्या उपनद्या कोपल्यामुळे आसामामधील दहा जिल्ह्यांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सुमारे एक लाख नागरिक बेघर झाले आहेत.

शेजारील अरुणाचल प्रदेशातून वाहणार्‍या ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्याचा फटका आसामला बसल्याचे दिसून येते. ब्रह्मपुत्रेच्या उपनद्यांनाही पूर आल्याने राज्यातील बहुतांश भागात पाणीच पाणी झाले आहे. अनेक गावांना पाण्याने वेढा दिला आहे. जूनपासून पहिल्यांदाच पुराने रौद्ररूप धारण केले आहे. मोरिगाव जिल्ह्यात पुरामुळे एकाचा मृत्यू झाला. धेमाजी, नागाव, गोलाघाट, जोरहाट, कामरप, करीमगंज, लखीमपूर, शिवसागर, तिनसुकिया जिल्ह्यातील एक लाख नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील काही प्राण्यांचा पुरामुळे मृत्यू झाला.