आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 38 Victims In Muzzafarnagar Riots, Inquary Committee Instituted

मुजफ्फरनगर दंगलीच्या बळींची संख्‍या 38 वर, चौकशीसाठी समिती स्थापन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ/ मुजफ्फरनगर - मुजफ्फरनगर जिल्ह्यातील दंगलीतील बळींची संख्या 38 वर पोहोचली असून दंगलग्रस्त भागातील संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. दंगलीच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती विष्णू सहाय यांची एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. दंगल भडकावण्याच्या आरोपावरून 360 लोकांना अटक करण्यात आली आहे. मुजफ्फरनगर जिल्ह्यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे.


प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल भाजप आमदार हुकूम सिंग, सुरेश राणा, भारतेंदू, संगीत सोम आणि कॉँग्रेसचे माजी खासदार हरेंद्र मलिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारला दंगल नियंत्रणात आणण्यात अपयश आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. सत्ताधारी समाजवादी पक्षाने हे आरोप फेटाळला आहे. शहरातील स्थितीचा अहवाल दर 12 तासाला पाठविण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्याला दिले आहेत.


कडक कारवाई करणार : अखिलेश
दंगल नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हिंसाचाराला चिथावणी देणा-यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिला आहे. कडक कारवाई न केल्यास दंगलीचे लोण अन्यत्र पसरेल, अशी भीती राष्‍ट्रीय लोकदलाचे नेते व केंद्रीय मंत्री अजित सिंग यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर बरेली जिल्ह्यातील संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.