आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसीहचा दावा: अपहृत ३९ भारतीयांची हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- इराकसह अनेक आखाती देशांमध्ये उच्छाद मांडलेल्या आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने इराकमधील ४० भारतीयांचे अपहरण करून एका डोंगरावर नेले व ३९ जणांना गोळ्या घातल्या. आयएसआयएसच्या ताब्यातून कसेबसे निसटलेल्या हरजित मसीह याने हा दावा केला आहे.

इराकहून परतलेल्या मसीह याने हा दावा केला असला तरी इतर कोणत्याही सूत्रांकडून त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही. भारत सरकारनेही मसीही याच्या दाव्यात तथ्यांश आढळणारे पुरावे अद्याप हाती नसल्याचे म्हटले आहे. मसीही याच्यानुसार, आयएसआयएसने इराकमधून ४० भारतीय व ५० बांगलादेशी नागरिकांचे अपहरण केले होते. या सर्वांना दहशतवाद्यांनी एका डोंगरावर नेऊन एका रांगेत उभे राहण्यास सांिगतले. नंतर भारतीय असल्याची खात्री करून फक्त भारतीयांनाच गोळ्या घातल्या.

मसीह कसा निसटला ?
अपहृत नागरिकांना एका रांगेत उभे करून दहशतवाद्यांनी त्यांच्या राष्ट्रीयत्वाबद्दल विचारणा केली. तेव्हा भारतीय व बांगलादेशी अशी विभागणी करण्यात आली. यात मसीह याने आपण बांगलादेशी असल्याचे सांगितले होते. नंतर ३९ भारतीयांची हत्या करण्यात आली आणि मसीह वाचला. स्वत: मसीहने भारतात परतल्यानंतर माध्यमांना िजवावर बेतलेला हा भयंकर प्रकार सांगितला.

संसदेतही मुद्दा गाजला
इराकमध्ये ३० भारतीयांचे अपहरण झाल्याचा मुद्दा गेल्या महिन्यात संसदेतही गाजला होता. इराकमध्ये असलेले भारतीय सुरक्षित आहेत किंवा नाहीत याबद्दल सरकारकडे काय माहिती आहे, अशी विचारणा विरोधी पक्षांनी केली होती.

सर्व भारतीय जिवंत : स्वराज
परराष्ट्रमंत्री स्वराज यांनी मसीहच्या दाव्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. अाठ विविध स्रोतांच्या माध्यमातून सरकारने इराकमधील भारतीयांबाबत माहिती मिळवली असून हे सर्व भारतीय सुरक्षित असल्याचे स्वराज यांनी म्हटले. विशेष म्हणजे या सर्व भारतीयांच्या कुटुंबीयांशी चर्चा झाली असल्याचेही स्वराज यांनी म्हटले आहे.