आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PAK कडून 24 तासांत तिसर्‍यांदा फायरिंग, राजौरीमध्ये एक जवान शहीद, 4 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान जम्मूू-काश्मीरच्या सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. पाकने रविवारी रात्री सीमेवर तीनदा शस्त्रसंधीचे उल्लंंघन केले. त्यात बीएसएफचा हेड कांस्टेबल शहीद झाला. तसेेच 4 जवान जखमी झाले आहेत.

गेल्या 24 तासांत पाकिस्तानी रेंजर्सनी तिसर्‍यांदा क्रॉस- बॉर्डर फायरिंग केली. भारतीय जवानांकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर देण्यात आले आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून काश्मीरच्या नौशेरा आणि सुंदरबनी भागात शनिवारपासून गोळीबार सुरु आहे. यात बीएसएफचा एक जवान आणि एक महिला जखमी झाली आहे. तसेच दोन घरांची मोठी पडझड झाली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, पाक सैन्याने सीमेलगतच्या गावांना लक्ष्य...
बातम्या आणखी आहेत...