आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Cops Kidnapped By Maoists In Chhattisgarh Killed

छत्तीसगड : 4 अपहृत पोलिसांची हत्या, नक्षलींनी रस्त्यावर फेकले मृतहेद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हत्या केल्यानंतर नक्षलवाद्यांनी रस्त्यावर मृतदेह फेकून दिले. - Divya Marathi
हत्या केल्यानंतर नक्षलवाद्यांनी रस्त्यावर मृतदेह फेकून दिले.
रायपूर - छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी 4 पोलिसांची हत्या केली आहे. सोमवारी रात्री त्यांचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांना बुधवारी सकाळी बीजापूरच्या कुटारू येथे मृतदेह आढळले. त्यांची नावे जयदेव यादव, मंगल सोढी, राजू तेला आणि रामा मज्जी अशी आहेत. नक्षलींनी या पोलिसांचे मृतदेह रसत्यांवर फेकून दिले. मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांचे स्पेशल अँटी नक्सल ऑपरेशनचे पथक तपासासाठी निघाले आहे.

प्रकरण काय?
नक्षलींनी छत्तीसगडच्या सकनापल्ली परिसरातून गेल्या सोमवारी चार पोलिसांचे अपहरण केले होते. पोलिसांचे हे जवान बीजापूरहून कुटरूकडे जात होते. दोन जवान बसमध्ये होते तर दोन मोटरसायकलवर होते. नक्षलींनी त्यांना गावाजवळ दाट जंगलामध्ये अडवले. स्थानिकांनी पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना धमक्या देऊन पळवून लावण्यात आले.

एसपीओनंतर बनले होते कॉन्सटेबल
मारले गेलेले पोलिसांचे जवान एसपीओचे ऑक्सिलरी कॉन्सटेबल बनले होते. एसपीओ म्हणजे स्पेशल पोलिस ऑफिसर. त्यांना कोया कमांडोही म्हटले जाते. नक्षलींचा निपटारा करण्यासाठी सरकार सामान्य नागरिकांमधून काही लोकांची निवड करून त्यांना एसपीओ बनवत असते. सुप्रीम कोर्टाने जुलै 2011 च्या एका आदेशात छत्तीसगडमध्ये एसपीओ पद्धत बंद करण्यास सांगितले होते. त्यामुळे सरकारने नवीन कायदा करत एसपीओंना ऑक्सिलरी कान्स्टेबल बनवले होते.

टार्गेटवर कॉन्सटेबल
एसपीओचे कॉन्सटेबल बनवण्यात आलेले पोलिस नेहमीच नक्षलींच्या टार्गेटवर असतात. एसपीओंना पोलिस विभाग अत्यंत कमी सुरक्षा प्रदान करत असल्याचा मुद्दाही वारंवार उचलला जातो.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS