चेन्नई - चेन्नईमध्ये शनिवारी (ता.28) संध्याकाळी इमारत कोसळ्याने 4 मजूरांचा मृत्यू , तर 30 जण ढिगारात अडकले. मुसळधार पावसानंतर बांधकाम चालू असलेली इमारत कोळसली. मृतांमध्ये मरूधू पांडियन (वय 40, राहणार मदुराई ), शंकर ( वय 27 ) , शांताकुमारी ( वय 25), चौथ्या मृतव्यक्तीचे नाव समजू शकले नाही. इमारतीच्या ढिगा-यात अडकलेल्यांसाठी सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रात्रभर बचाव कार्य सुरू होते.
शनिवारी आपली रोजंदारी घेण्यासाठी बांधकाम स्थळी 100 मजूर आले होते. इमारतीच्या बांधकामासाठी आलेले बहुतेक मजूर हे आंध्र प्रदेश, ओदिशा आणि तामिळनाडू या राज्यातील होते. मोठी मेघगर्जना झाली आणि इमारत एका पत्त्याच्या इमारतीसारखी कोसळली, असे घटनाप्रसंगी उपस्थिती असलेल्या एका मजूराने सांगितले.
घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींविरूध्द पोलिसांनी कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री जयललिता यांनी दिले. चेन्नईचे पोलिस आयुक्त एस. जॉर्ज यांनी सांगितले की, इमारतीचे मालिक मनोहरन आणि त्यांच्या मुलाला अटक करण्यात आले आहे.