आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या गोळीबारात 5 नागरिक ठार तर 31 जखमी; 56 इंचाची छाती गेली कुठे? काँग्रेसचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. सीमेजवळ अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून रात्री दीड वाजेपासून सलग फायरिंग सुरू आहे. तसेच यावेळी पाककडून ग्रेनेड हल्लाही करण्यात आला. यात झोपलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि एका 13 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. 2003 च्या शस्त्रसंधीनंतर हे सर्वात मोठे उल्लंघन असल्याचे एका अधिका-याचे म्हणणे आहे.
दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणी पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारतात आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे असे राजनाथ सिंह म्हणाले आहेत. तर काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. 56 इंचाची छाती आता कुठे गेली माहिती नाही. आता कोणी नजरेला नजर भिडवून बोलतही नाही, असे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले.
त्याआधी पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. मेंढर सेक्टरमध्ये सीमेपलिकडून भारतीय चौक्यांवर जोरदार फायरिंग झाली होती. त्याला भारतीय लष्कराकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. घटनेत अद्याप जवान शहीद झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. या महिन्यात शस्त्रसंधी केल्याची पाकिस्तानची ही दहावी वेळ आहे.

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पुंछमध्ये पाकिस्तानी जवानांनी सकाळी सुमारे आठ वाजता फायरिंग सुरू केली. सुमारे अर्धा तास दोन्ही बाजुंनी गोळीबार झाला. फायरिंग बंद झाल्यानंतर जवानांनी नियंत्रण रेषेच्या जवळ गस्तही घातला. त्यात दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत काहीही पुरावे मिळालेले नाहीत. भाजपने पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारावर टीका केली आहे. सीमेवर पाकिस्तानला काय उत्तर द्यायचे, याचा निर्णय घेण्याचे अधिकार लष्काराला असल्याचे केंद्रीय मंत्र रवीशंकर प्रसाद म्हणाले आहेत.
शनिवारी मुशर्रफ यांनी दिलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना प्रसाद म्हणाले की, मुशर्रफ यांना पाकिस्तान कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची काहीही गरज नसल्याचे ते म्हणाले आहेत. भारताकडून नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन योग्य नसल्याचे मुशर्रफ म्हणाले होते. भारताने पाकिस्तानच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असे मुशर्रफ म्ङणाले होते.

फोटो - पुंछमध्ये झालेल्या स्फोटातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सैनिकांचे मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर पाहा जखमींचे फोटो...