आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO- रायपूर: लॉजमध्ये लागलेल्या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू, 2 महाराष्‍ट्रातील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- रायपुरमधील तुलसी लॉजमध्ये लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्या महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. तब्बल 12 तास चाललेल्या बचाव कार्यात 7 जणांना वाचवण्यात पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवावांना यश आले आहे.
मृत व्यक्तिंची ओळख पटली असून दीपक मिश्रा (नागपूर), प्रवीण पुरोहित (मुंबई), पोपटलाल (राजस्थान), दलपत (राजस्थान) आणि तुलाराम- (राजस्थान) अशी मृतांचे नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी की, शहरातील गोल मार्केटमध्ये तुलसी लॉजला आज (सोमवारी) पहाटे तीन वाजेच्या सुमारास आग लागली. पोलिस आणि फायर ब्रिगेडच्या जवानांना 7 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

प्रत्यक्षदर्शीनी सांगितलेली माहिती अशी की, लॉजसमोरील इलेक्ट्रिक पोलवर शॉर्ट सर्किट झाल्यानंतर लॉजमध्ये भीषण आग भडकली. लॉजसह मार्केटमधील इतर चार दुकाने या आगीत जळून खाक झाली आहेत. शहरातील हा सर्वाधिक वर्दळ असलेला परिसर आहे. 

तुलसी लॉजमध्ये रविवारी रात्री 11 जण थांबले होते. रात्री सगळे गाढ झोपेत असताना लॉजला भीषण आग लागली. आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला. एका जखमीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. बचाव पथकाने इतर सात जणांना दुसर्‍या बिल्डिंगवरुन सुखरुप बाहेर काढले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून फोटोज आणि व्हिडिओतून पाहा, तुलसी लॉजमध्ये लागलेल्या भीषण आगीची दाहकता...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...