आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लडाखमध्ये हिमकडा कोसळल्याने चार जवानांचा झाला मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- जम्मू-काश्मीरच्या लडाख क्षेत्रात रविवारी बर्फाचे शिखर ढासळल्यामुळे लष्कराच्या चार जवानांचा मृत्यू झाला. हे जवान या भागात गस्तीवर गेले होते.
दरम्यान, बचाव पथकांनी त्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून हवालदार तरेस्वांग नुरसू, दोरजू, शिपाई मोहंमद युसूफ आणि जिगमेद अशी त्यांची नावे आहेत. चारही जवान मूळ लद्दाखचेच होते.
लष्कराचे प्रवक्ते कर्नल एस. डी. गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ लडाख स्काऊट्सचे पथक रविवारी दुपारी साऊथ ग्लेशिअर भागात गस्तीसाठी गेले असताना अचानक हिमस्खलन झाले. चारही जवान बर्फाच्या स्खलनात बऱ्याच अंतरापर्यंत सरपटत गेले. दरम्यान, बचाव दलाने रात्रभर शोधमोहीम चालवली होती.
बातम्या आणखी आहेत...