आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर प्रदेश आणि ओडिशामध्ये 12 तासांत 4 रेल्वे अपघात; 8 ठार, 11 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश आणि ओडिशामध्ये गुरुवार व शुक्रवारदरम्यान अवघ्या १२ तासांत ४ रेल्वे अपघात झाले. यात ८ प्रवासी ठार तर ११ जखमी झाले. यातील तीन अपघात उत्तर प्रदेशात झाले आहेत.

 

1 गुरुवारी सायंकाळी ७.१९ वा. अमेठीजवळ लोकल रेल्वेने रेल्वे क्रॉसिंगवर बोलेरो कार उडवली. यात ५ ठार, २ जखमी.  
2 शुक्रवारी पहाटे २.३५ वा. जम्मू-पाटणा अर्चना एक्स्प्रेसचे कप्लिंग तुटले.

3 पहाटे ४.१८ वा. वास्को द गामा-पाटणा एक्स्प्रेसचे चित्रकोट जिल्ह्यात १३ डबे घसरले. यात ३ जण ठार झाले, तर ९ जखमी झाले आहेत.
4 ५.५५ वा. परादीप-कटक ही कोळसा घेऊन जाणारी मालगाडी ओडिशातील गोरखनाथ-रघुनाथपूर या स्थानकांदरम्यान घसरली.

 

बातम्या आणखी आहेत...