आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांचा पती 40 वर्षांची पत्नी, VIDEO मधून पाहा या अजब-बजब नात्याचे सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार वर्षांचा राजेश चाळीस वर्षांच्या महिलेला स्वतःची पत्नी असल्याचे सांगत आहे. - Divya Marathi
चार वर्षांचा राजेश चाळीस वर्षांच्या महिलेला स्वतःची पत्नी असल्याचे सांगत आहे.
मुरादाबाद - शीर्षक वाचून धक्का बसला ना ! हे जग अजब-गजब घटनांनी भरलेले आहे. कुठे काय होईल याचा काही नेम नाही. मुरादाबादमधील बिलारी तालुक्यातील तारापूर येथे चार वर्षांचा एक मुलगा त्याचा पुनर्जन्म झाल्याचे सांगत असून, स्वतःला 35 वर्षांचा पप्पू असल्याचे सांगत आहे. खरसौल येथील विश्वंभर उर्फ पप्पूची 2010 मध्ये गोळ्यामारून हत्या करण्यात आली होती. (शेवटच्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ)

साडेचार वर्षांचा आहे राजेश
- मुरादाबादमधील तारापूर येथे जन्म झालेल्या राजेशचे वय साडे चार वर्षे आहे.
- एक दिवस तो त्याच्या आई-वडिलांसह तारापूरपासून दोन किलोमीटर अंतरावरील खरसौल गावात गेला होता.
- येथील एका चहा - भजी विक्री करणाऱ्या टपरीवर तो गेला आणि भजी विक्रेत्या रिंकूच्या कुशीत जाऊन बसला.
- रिंकूने त्याला कोण आहे असे विचारल्यानंतर तो म्हणाला, मी तुझा पिता पप्पू उर्फ विश्वंभर आहे. विशेष म्हणजे विश्वंभरची 2010 मध्ये हत्या झाली होती.

चिमुकल्याने केले आश्चर्यचकित
- राजेशने सर्वप्रथम पप्पूच्या मृत्यूची पूर्ण कथा सांगितली.
- ज्या ठिकाणी त्याच्यावर गोळीबार झाला त्या ठिकाणाबद्दल सांगितले.
- सर्वांना घटनास्थळी घेऊन गेला. तिथे असलेल्या खंब्याकडे इशार करत त्याने सर्व घटनाक्रम सांगितला.
- त्याच्या पाठीवर असलेली खून दाखवत येथेच गोळी लागल्याचे राजेशने सांगितले.
- पप्पूच्या पाठीवर गोळी लागली होती, हे विशेष.
- घरी गेल्यानंतर राजेशने पप्पूच्या फोटोवर बोट ठेवत हा माझा फोटो असल्याचे सर्वांना सांगितले.
- मृत पप्पूची विधना पत्नी लक्ष्मीजवळ जात त्याने तू माझी पत्नी असल्याचे म्हटले.
- अवघ्या चार वर्षांचा मुलगा सर्व घटना काल घडल्या प्रमाणे सांगत असल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
- एवढेच नाही तर, लक्ष्मीने पप्पूच्या मृत्यूनंतर घरात केलेले बदलही त्याने जशेच्या तसे सांगितले.
- यामुळे पप्पूचा राजेशच्या रुपात खरचं पुनर्जन्म झाला काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...