आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Youths Killed Came To Celebrate The New Year,Found Charred Skeleton

न्यू ईयरच्या पूर्वसंध्येला कारमध्ये जाळले चार युवकांना, हरियाणातील बहादुरगडमधील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहादुरगड- हरियाणातील बहादुरगडमधील इसरहेडी गावातील जंगलात न्यू ईयरच्या पूर्वसंध्येला चार युवकांना कारमध्ये जाळण्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (1 जानेवारी) सकाळी एका जळीत कारमध्ये चार जणांचे मृतदेह आढळून आले. चौघांची हत्या करून नंतर त्यांना जाळण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
दिल्ली नजफगडमधील मित्राव गावातील सुधीर (32 ), मनीष (28) आणि संदीप (23) या तिघांचा मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसरीकडे, समसपूरच्या हद्दीत 17 वर्षीय दीपकचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. पुर्नवैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे मृतांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.
31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली असून गुरुवारी सकाळी हे प्रकरण उजेडात आले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी निघाले होते चौघे
चौघे तरुण नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. चौघे रात्री एका मित्राकडे थांबले होते. तिथे चौघांनी मद्यपान केले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. बुधवार रात्री 11 वाजता नातेवाईकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौघांशीही संपर्क होऊ शकला नाही.
कारच्या नंबरवरून नातेवाईकांपर्यंत पोहोचले पोलिस...
जळीत कारच्या नंबर प्लेटच्या मदतीने पोलिस मृत तरुणांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले. नंतर घटनास्थळी नातेवाईकांनी मृतदेह ओळखले.

कारमध्ये सापळले काडतूस
पोलिसांना जळीत कारमध्ये एक काडतूस आढळले आहे. चौघांना जाळण्यासाठी त्यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, केरळमध्ये नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करून परतणार्‍या सहा इंजीनियर्सचा दुर्घटनेत मृत्यु