आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्‍याचे संघचालक सुभाष वेलिंगकरांना पदावरुन काढले, 400 स्वयंसेवकांनी दिले राजीनामे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - शिस्तबद्धतेबाबत प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोवा शाखेत स्वयंसेवकांनी बंड पुकारले आहे. राज्याचे प्रचारप्रमुख सुभाष वेलिंगकर यांना संघाने बडतर्फ केल्यानंतर सुमारे ६०० स्वयंसेवकांनी संघाशी फारकत घेतली असून ‘आरएसएस गोवा’ नावाने पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत हे स्वयंसेवक नवी संघटना चालवतील.

‘आम्ही संघाचा नागपूर मुख्यालयाशी आता नाते तोडले आहे. आमच्या शाखा पूर्वीसारख्याचसुरू राहेतील,’ असे वेलिंगकर यांनी गुरुवारी सांगितले. सरसंघचालकांचा आम्ही कायम आदर बाळगू, असेही त्यांनी म्हटले आहे.

गोव्यात इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांना अनुदान देण्याबाबतच्या निर्णयाला वेलिंगकर यांचा विरोध होता. भाजपचा हा पराभव असल्याचे सांगत त्यांनी पुढील निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याची भाषा केली होती.

पर्रिकर, गडकरींवर टीका
इंग्रजी शाळांना अनुदान देण्याबाबतच्या निर्णयात केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर आणि नितीन गडकरी यांनी हिंदूंशी प्रतारणा केली असल्याचे वेलिंगकर यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण..
- इंग्रजी माध्यमांच्या शाळांना देण्यात येणारे अनुदान बंद करण्याची मागणी करून मंचातर्फे आंदोलन छेडण्यात आले आहे.
- प्रा. वेलिंगकर हे मंचाचे समन्वयक असून त्यांनी भाजपला राजकीय पर्याय देण्याचा इशारा दिला होता.
- माजी मुख्यमंत्री आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ‘भाभासुमं’शी आणि मातृभाषाप्रेमींशी प्रतारणा केल्याचा आरोपही त्यांनी केला.
- नुकतेच राज्यात येऊन गेलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भाभासुमंतर्फे काळे झेंडे दाखवण्यात आले.
- याच वेळी भाजपविरोधी घोषणाही देण्यात आल्या होत्या.
- शहा यांना काळे झेंडे दाखवल्‍यामुळे व भाजपविरोधी भूमिका घेतल्‍यामुळे वेलिंगकर यांच्‍यावर कारवाई झाल्‍याचे बोलले जात आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कसे वाढत गेले प्रकरण, कोण काय म्‍हणाले..
बातम्या आणखी आहेत...