आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील 418 कोळसा खाणींचे सेफ्टी ऑडिट होणार, पीयूष गोयल यांची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- देशातील कोळसा खाणींतील सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असल्यामुळे ४१८ खाणींचे सेफ्टी ऑडिट केले जाणार आहे, अशी घोषणा ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. 

कोल इंडियाच्या उच्चाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आम्ही देशातील कोळसा खाणींच्या सुरक्षेचा कडक आढावा घेण्याचा निर्णय घेतला. कोळसा खाणीतील मजुरांच्या जीविताला असलेला धोका वाढला आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या काही उपाययोजनादेखील सुचवण्यात आल्या आहेत. बंगालमधील घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर देशभरातील ४१८ खाणींच्या सुरक्षेचा बारकाईने अभ्यासदेखील केला जाणार आहे, असे गाेयल यांनी सांगितले. कोळसा खाण सुरक्षेचे महासंचालकांच्या अंतर्गत  सुरक्षा आॅडिट केले जाणार आहे. खाणीच्या आकारानुसार त्याबाबतचे मूल्यांकन केले जाईल, असे गोयल यांनी स्पष्ट केले.  

उत्पादनाचा ताण कमी होणार  
देशात ५८ मोठ्या कोळसा खाणी आहेत. त्यांच्यावर उत्पादनाचा वार्षिक मोठा बोजा असतो. तो कमी केला जाणार आहे. तो सरासरी १० ते ५० लाख घनमीटरपर्यंत असेल. त्यामुळे खाणींवर अतिरिक्त उत्पादनाचा ताण दूर होईल, याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गाेयल यांनी दिली.  

पावले उचलली  
खाणींच्या सुरक्षेविषयी केंद्र सरकार गंभीर आहे. त्यासाठी खाणींच्या परिसरात इशारा देणारी यंत्रणा सज्ज ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर वायू नियंत्रण करणारी स्वतंत्र व्यवस्थादेखील खाणीच्या परिसरात असेल. 

झारखंडचा धडा 
झारखंडमधील राजमहल येथील कोळसा दुर्घटनेतून केंद्र सरकारने धडा घेतला आहे. गेल्या आठवड्यातील या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावरून सरकारने देशातील सर्व खाणींच्या सुरक्षेची कडक तपासणी करण्याचा निर्णय घेतले. घटनेनंतर सुरक्षेविषयक प्रश्न निर्माण झाले. 
बातम्या आणखी आहेत...