आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या सोमनाथाला 3 वर्षांत 11.38 कोटीचे सोने, 1.40 कोटी लोकांनी घेतले ऑनलाइन दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरावल - गुजरातच्या सोमनाथ मंदिरात गेल्या तीन वर्षांत ११.३८ कोटी रुपयांचे ४३.६१ किलोग्रॅम सोने दानात मिळाले आहे. मुंबईच्या लखी कुटुंबीयांनी ४० किलो ३१० ग्रॅम सोने एकट्याने दान केले. या दानातून ज्योतिर्लिंग धामच्या भिंतींना सोन्याचा मुलामा करण्यात आला आहे. दानामध्ये १०५.६११ किलोग्रॅम चांदी मिळाली असून याची एकूण किंमत ३० लाख ७१ हजार ३३५ रुपये इतकी आहे. २०१५-१६ मध्ये १२.५० लाखांची चांदी मिळाली होती.
 
याशिवाय ८९ लाखांहून अधिक रकमेचे डिजिटल दान मिळाले होते. सोमनाथ ट्रस्टच्या मते दानात मिळालेल्या ४३.६१२ किलो सोन्यापैकी ४१ किलो ५०९ ग्रॅम सोने १०० टक्के शुद्ध आहे. ७० ते ९० टक्के शुद्ध साेने दानात मिळालेले आहे.  

लखी कुटुंबांचे योगदान सर्वाधिक : सोमनाथाला दान देण्यात मुंबईच्या लखी कुटुंबांचे स्थान अव्वल ठरले. तीन वर्षांत या कुटुंबाने ४० किलो ३१० ग्रॅम सोने दानात दिले. या सोन्यातून सोमनाथ मंदिराच्या भिंतीना साेन्याचा मुलामा करण्यात आला.  
 
१.४० कोटी लोकांनी घेतले ऑनलाइन दर्शन  
श्रावणात सोमनाथाच्या दर्शनासाठी १.४० कोटी भाविकांनी सोशल मीडियाचा वापर केला. फेसबुकद्वारे या भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. यात अमेरिका, सौदी अरब, अमिरात, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानातील भक्तांचा ऑनलाइन दर्शन घेणाऱ्यात समावेश आहे.
 
बातम्या आणखी आहेत...