आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भरधाव कारखाली चिरडून 8 वर्षीय बालकाचा मृत्यू, संतप्त जमावाच्या मारहाणीत कारचालकही ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना - येथे मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला गेलेल्या फायनान्सर संजीव कुमार बब्बूच्या कारने गल्लीत खेळणाऱ्या 4 मुलांना चिरडले. 8 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले. जखमींपैकीही एकाची प्रकृती चिंताजनक आहे. संजीव यांचा भाऊ विपन कुमार म्हणाला, चिमुकल्याच्या मृत्यूमुळे चिडलेल्या कुटुंबीयांनी संजीवला बेदम मारहाण करून त्याचाही जीव घेतला.


भीतीमुळे झाला कारचालकाचा मृत्यू
- परिसरातील लेाकांचे म्हणणे आहे की, बालकाच्या मृत्यूमुळे संतप्त लोक पाहून संजीवचा भीतीमुळे मृत्यू झाला.
- दुसरीकडे, तिन्ही जखमी मुले बल्लू (5), शिवाना (14) आणि शहबाज (8) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बल्लूची प्रकृती चिंताजनक आहे.

 

काय म्हणतात पोलिस?
- टिब्बा रोड पोलिस स्टेशनचे इंचार्ज कपिल कुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संजीव आणि अरमानचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. मृत संजीवचा भाऊ विपन कुमार याच्या जबाबावर पोलिसांनी कारवाई केली.

 

काय आहे प्रकरण?
- टिब्बा रोड परिसरात राहणारे संजीव कुमार यांच्या मुलीचे लग्न 28 नोव्हेंबर रोजी आहे. गुरुवारी रात्री 9 वाजता ते त्यांचे परिचित कृष्णलाल यांना लग्नपत्रिका द्यायला गेले होते. परत येताना हा अपघात झाला.

- संजीव यांचे नातेवाईक कृष्ण कुमार म्हणाले- मी घटनास्थळी पोहोचलो तेव्हा संतप्त जमाव संजीवला बेदम मारहाण करत होता. या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला.
- दुसरीकडे, मृत बालकाच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांचा मुलगा-मुलगी आणि शेजारची दोन मुले पीरच्या मजारवर गेले होते. ते परत येत असताना हा अपघात झाला. कारचालकाच्या चुकीमुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...