आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीच्या लव मॅरेजला होता आईचा विरोध, रात्री 3 वाजता प्रियकराने केले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत महिला शरणजीत आणि बेडरूमध्ये सांडलेेले रक्त - Divya Marathi
मृत महिला शरणजीत आणि बेडरूमध्ये सांडलेेले रक्त

जालंधर- येथे शनिवारी रात्री 3 वाजता एक आई जखमी अवस्थेत आपल्या मुलाच्या खोलीत गेली आणि धाडकन जमिनीवर कोसळली. मुलान तिला तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात नेले, परंतु तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की, जालंधर येथील लधेवालीमध्ये राहणारी 45 वर्षाची महिला शरणजीत कौरची हत्या झाल्याचे समोर आले आहे. अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, गल्लीत लावलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱॅत एक संशयीत दिसला आहे आणि चौकशीदरम्यान तो मृत महिलेचा प्रियरकर सरबजीत असल्याचे सांगण्यात येते आहे.

 

मृत महिला शरणजीत कौर आपल्या मुलासोबत राहत होती. घटनेच्या रात्री मुलगा वरच्या खोलीत झोपलेला होता आणि शरणजीत कालीच्या रूमध्ये होती. मुलाने सांगितले की, आई रात्री 3 वाजता जखमी अवस्थेत माझ्या खोलीत आली आणि जमिनीवर कोसळली, तेव्हा तिच्या गळ्यातून रक्त निघत होते. तिच्या गळ्यावर चाकून तीन-चार वार करण्यात आले होते. मी लगेच आईल घेऊन दवाखाण्यात गेलो, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.


प्रकरणाची चौकशी करत असलेले पोलिस अधिकारी सतिंदर चड्डा यांनी सांगितले की, गल्लीत एक सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे. त्यातील फूटेज चेक केले तेव्हा रात्री 2 वाजून 25 मिनिटांनी गल्लीत एक व्यक्ती येताना दिसत आहे आणि रात्री 2 वाजून 40 मिनिटांनी तो पळून जाताना दिसला आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्हीत दिसणारा संशयीत सरबजीत असून तो मृत महिलेच्या मुलीचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

फेसबुकवर झाली होती मैत्री...
पोलिसांनी सांगितले की, चौकशी दरम्यान असे कळाले की, मृत महिलेची मुलगी कॅनेडामध्ये शिकत आहे. आरोपी सरबजीतही दूबईत राहतो. तो नेहमी जालंधरमध्ये आपल्या घरी येत-जात असतो. या दरम्यान फेसबुकवर त्याची मैत्री सरबजीतच्या मुलीशी झाली. त्यानंतर सरबजीतचे त्यांच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. जेव्हा मृत महिलेला या नात्याविषयी कळाले तेव्हा तिने या नात्याला विरोध केला. त्यांच्या लग्नालाही नकार दिला. यावरून नाराज झालेल्या सरबजीतने महिलची हत्या केली, परंतु अद्याप पोलिस सरबजीतला अटक करू लकलेले नाही.


पुढील स्लाइडवर पाहा, संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...