आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इफ्फी महोत्सवात 90 देशांतील 300 चित्रपटांची मेजवानी; आज उद्‌घाटन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या उपस्थितीत 47 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) रविवारी प्रारंभ होणार आहे. पणजी येथे दि. 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान हा महोत्सव होईल. यात 90 देशांतील 300 चित्रपटांची मेजवानी राहील, अशी माहिती प्रेस ब्युरो ऑफ इंडियाचे संचालक सेंथील राजन, इफ्फीचे सीईओ अमेय अभ्यंकर, राजेंद्र तलक यांनी दिली.

जगभरातील विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांत पुरस्कार मिळवणारे चित्रपट हे या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. अनोखी शैली, दर्जेदार कथानक आणि सादरीकरणामुळे रसिकांना वेड लावणारे 33 जगविख्यात चित्रपट यंदाचे विशेष आकर्षण राहील. यातील 21 चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत, तर 12 चित्रपट कान्समध्ये समीक्षकांच्या पसंतीस उतरलेले आहेत. साहित्याचा नोबेल पुरस्कार विजेते अर्जेंटिनाचे डॉ. मँटोवानी यांच्या आयुष्यावर आधारित ‘द डिस्टिंग्विश्ड सिटिझन’, फ्रान्सचे जगविख्यात लेखक बर्नार्ड हेन्री लेव्ही यांच्या नाटकावर आधारित ‘डेथ इन साराजाव्हो’, ‘इट्स ओन्ली एंड ऑफ वर्ल्ड’ (कॅनडा), ‘ऑन अदर साइड’ (क्रोएशिया) आदी ऑस्कर नामांकन मिळवणाऱ्या चित्रपटांचा यात समावेश आहे . आफ्टरइमेज या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात, तर एज शॅडो चित्रपटाने सांगता होईल.

एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा गौरव
मागील पाच दशकांपासून विविध भाषांतील गाण्यांना आपल्या सुमधुर सुरांचा साज चढवणारे प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना उद््घाटन समारंभावेळी विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यंदाच्या महोत्सवात बार्को लेझर प्रोजेक्टर टेक्नाॅलॉजीचा उपयोग करण्यात आला असून हॉलीवूडमध्ये वापरले जाणारे हे तंत्रज्ञान प्रथमच वापरण्यात येत असल्याचे अमेय अभ्यंकर यांनी सांगितले.

कोरियन लेखक क्वोन तायेक इम यांचा सन्मान
तब्बल पाच दशकांहून अधिक काळापासून आपल्या अनोख्या लेखन, दिग्दर्शन कौशल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणारे कोरियाचे क्वोन तायेक इम यांना यंदाच्या इफ्फी महोत्सवात ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाईल. त्यांच्या 100 पेक्षा अधिक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या ‘द एज ऑफ शॅडो’ या चित्रपटानेच यंदाच्या महोत्सवाची सांगता होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...