आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 480 Crores Electricity Bill Come To Bihar Student

बिहारमध्ये विद्यार्थ्याला ४८० कोटींचे वीज बिल, राष्ट्रपती भवन-पीएमओपेक्षाही जास्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - वीज बिल अव्वाच्या सव्वा आल्याच्या अनेक घटना वाचायला मिळतात. परंतु बिहारमध्ये मात्र एका विद्यार्थ्याला ४८० कोटी रुपयांचे बिल आले आहे. ही रक्कम पाहून विद्यार्थी चक्रावून गेला नसता तरच नवल.

पाटण्यातील बहादूरपूर हाउसिंग कॉलनीत राहणा-या विद्यार्थ्याचे नाव अमन आहे. वीज बिल घरमालक पवनकुमार चौधरी यांच्या वडिलांचे नाव आहे. अमनच्या खोलीत दोन बल्ब, एक पंखा आहे. एवढा मर्यादित वापर असतानाही त्याला ४ अब्ज ८० कोटी ३३ लाख ८१ हजार रुपये वीज बिल आले. त्यावर घरमालकांनीही हात झटकले. त्यानंतर त्याने अर्ज दिला. त्यानुसार बिल कमी करण्यात आले. परंतु तेही १८०० रुपये देण्याचे आदेश देण्यात आले.

०४ कोटी रुपये वार्षिक राष्ट्रपती भवनाचे सरासरी वीज बिल
१३ लाख रुपये सुमारे पीएमओ आणि परिसराचे वार्षिक बिल

१०० कोटींचे महिन्याचे लक्ष्य
दक्षिण बिहार वीज विभागाने दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे; परंतु थकबाकी वसूल करणा-या संस्थेला ते जमले नाही.