आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 5 Army Men Killed In Attack By Pak Troops On Indian Post Along LoC In Poonch Sector

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 जवानांच्‍या बदल्‍यात पाकिस्‍तानात घुसून 50 ठार मारा; शिवसेनेची आक्रमक भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेह- पाकिस्‍तानी सैन्‍याने पुंछ सेक्‍टरमध्‍ये भारतीय चौकीवर हल्‍ला केला असून त्‍यात भारताचे 5 जवान शहीद झाले आहेत. हा हल्‍ला सोमवारी रात्री उशीरा करण्‍यात आला. पाकिस्‍तानी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसून हल्‍ला केल्‍याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. यासंदर्भात सैन्‍याने अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. परंतु, जम्‍मू आणि काश्मिरचे मुख्‍यमंत्री ओमर अब्‍दुल्‍ला यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. सर्व शहीद जवानांचे पार्थिव भारतीय लष्‍कराने ताब्‍यात घेतले आहे. दरम्‍यान, शिवसेनेने या मुद्यावरुन अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्‍हणाले, 'भारतीय लष्कराचे जवान जोपर्यंत पाकिस्तानमध्ये घुसून 50 पाक सैनिक ठार करत नाही. तोपर्यंत या पाच जवानांचा बदला पूर्ण होणार नाही.'

गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतानाच केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. भारतीय सैनिकांची हत्‍या आम्‍ही सहन करणार नाही, असे मोदी म्‍हणाले. देशाच्‍या सीमेचे रक्षण करण्‍यात युपीए सरकार अपयशी ठरले असून सरकार कधी जागे होणार आहे, असा सवालही मोदींनी केला.

सुत्रांच्‍या माहितीनुसार, 20 पाकिस्‍तानी सैनिक भारतीय सीमेत घुसले होते. पाकिस्‍तानी सैनिकांनी मध्‍यरात्रीनंतर भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि गस्‍तीवर असलेल्‍या सैनिकांवर हल्‍ला केला. एक सुभेदार आणि 4 सैनिक शहीद झाले. भारतीय हद्दीत 450 मीटर आत पहाटे 2 वाजता हा हल्‍ला झाला, अशी माहिती सैन्‍याच्‍या सुत्रांनी दिली. सैन्‍यप्रमूख जनरल बिक्रम सिंग परिस्थितीचा आढावा घेत असून वरिष्‍ठ अधिका-यांची नवी दिल्‍लीत बैठक सुरु आहे.