आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Died In Explosion In Bhilai Steel Plant Latest Hindi News

भिलाई स्टील प्लांटमध्ये गॅस गळती; 6 ठार, 34 हून अधिक अस्वस्थ, स्फोटानंतर गळती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिलाई - छत्तीसगड येथील भिलाई स्टील प्लांटमध्ये गुरुवारी मोठा अपघात झाला. कार्बन मोनॉक्साइड या विषारी वायूची गळती झाल्याने दोन डीजीएमसह सहा जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातानंतर प्लांटमध्ये एकच गोंधळ उडाला त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एक जण ठार झाला आहे. या दुर्घटनेमध्ये 34 हून अधिक कर्मचारी अस्वस्थ आहेत. त्यापैकी 12 जणांची स्थिती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. ही दुर्घटना भोपाळ वायू दुर्घटनेप्रमाणे रौद्र रूप धारण करणार अशी शक्यता वाटत होती. पण सुदैवाने वायू गळतीचे प्रमाण कमी होते.

सायंकाळी पाचच्या सुमारास वायू गळती होत असल्याचे लक्षात आले. लगेचच जवळपास असणारे अधिकारी आणि कर्मचारी या गळतीमुळे अस्वस्थ झाले. वॉटर मैनेजमेंट विभागाचे बीके सिंह, डीजीएम एनसी कटारिया, चार्जमॅन ए.सॅम्युअल, सीनियर ऑपरेटर वाय एस साहू, फायरमॅन रमेश कुमार शर्मा आणि कर्मचारी विकास वर्मा यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. फायर ब्रिगेड आणि सीआईएसएफच्या जवानांचाही रुग्णालयात दाखल असणा-यांमध्ये समावेश आहे.
अशी झाली दुर्घटना
बीएसपीमध्ये (जीसीपी) गॅस सिलिंग प्लान्ट आहे. येथे पंप हाऊस नंबर-2 मधून पाणी पाठवले जाते. पंपहाऊस ग्राऊंड ग्राउंड लेव्हलपेक्षा 35 फूट खाली आहे. सप्लायच्या वेळी वेगाने पाणी जीसीपीमध्ये जाते. पण काहीतरी कारणामुळे पाण्याचा प्रवाह थांबल्याने जीसीपीमधून गॅश रिव्हर्स आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पाणी आणि गॅस एकाचवेळी आल्याने पाइपचे तापमान वाढले आणि यात ब्लास्ट झाला. त्यानंतर वायूगळती सुरू झाली.

व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा
1. बीएसपीने ब्लास्ट फर्नेंला होणारा पाणी सप्लाय बंद केला नाही, कारण तसे केले असते तर उत्पादन थांबले असते. हेच दुर्घटनेचे सर्वात मोठे कारण समजले जात आहे.
2. चार दिवसांपूर्वीच गॅस गळतीमुळे एका जणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तरीही बीएसपीने सुरक्षेसंदर्भात पावले उचलली नाहीत.
3. ब्लास्ट फर्नेंसच्या पाइप लाइनला हेवी मेंटनंस करायला पाहिजे पण गेल्या 10 वर्षांपासून मेंटनंस झालेच नाही.
4. कार्बन मोनॉक्साईड हा वायू मृत्यूचे कारण बनला. हा वायू इतर वायूंप्रमाणे हवेत वर जात नाही. ऑक्सिजनप्रमाणे तो हवेतच राहतो. ज्याठिकाणी ही दुर्घटना झाली तेथे बाहेरील हवेचा काहीही परिणाम नव्हता. त्यामुळे काही जणांचा जागीच मृत्यू झाला.

पुढे वाचा मास्क नव्हते... ओला रुमाल बांधून केले मदतकार्य... सीआईएसएफ जवानांमुळे टळली दुर्घटना