आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी सहकार्‍यालाच अण्णांच्या निःपक्षतेवर शंका, वाचा यासह 5 महत्त्वाच्या बातम्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सांगण्यावरूनच आपण राजकारणात आलो होतो. परंतु लोक आता त्यांच्या निष्पक्षतेवर आता शंका घेऊ लागले आहेत. देशात बदलाची जी प्रक्रिया सुरू होती, तीही आता थंडावली आहे. अण्णांच्या मंचावर काँग्रेस, आम आदमी पार्टी व तृणमूल काँग्रेसचे नेते दिसत आहेत, अशी टीका केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व्ही. के. सिंह यांनी केली.

शनिवारी "दिव्य मराठी' नेटवर्कशी बोलताना सिंह म्हणाले, अण्णांच्या व्यासपीठावर दिसणाऱ्या या लोकांनी त्यांना मुख्य प्रवाहातून दूर लोटण्याचा प्रयत्न केला आहे. उल्लेखनीय गोष्ट अशी की लष्करप्रमुख या पदावरून निवृत्त झाल्यानंतर जनरल सिंह यांनी लोकशाही मोर्चा स्थापन केला होता व अण्णांना सोबत घेऊन विविध राज्यांचे दौरे केले होते. पाकवर सध्या कुणाचे नियंत्रण आहे हेच समजत नाही. तेथील सरकार काही वेगळेच सांगू इच्छिते. परंतु पाक लष्कर, आयएसआय व दहशतवादी संघटना दुसरेच काहीतरी बोलत आहेत.

अशा परिस्थितीत तसेच जोवर गोळीबार, बॉम्बस्फोट सुरू असतील तोवर पाकशी चर्चा होऊ शकत नाही, असेही सिंह यांनी एका उत्तरात स्पष्ट केले.
पुढील स्लाइडवर वाचा, सेवाकर सध्या 12 टक्केच...