आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या गोळीबारात ५ भारतीय ठार, आजवरचे सर्वांत मोठे उल्लंघन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - ऐन बकरी ईदच्या मुहूर्तावर पाकिस्तानी सैनिकांनी पूंछ जिल्ह्यात नागरी वस्त्यांसह सुरक्षा चौक्यांवर तुफान गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. यात ५ नागरिक ठार तर ३५ जण जखमी झाले. पाकने केलेले युद्धबंदीचे हे आजवरचे सर्वांत मोठे उल्लंघन आहे.
माशे दे कोटे गावात घराबाहेर एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. अरनिया भागातही एक जण ठार झाला. अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले. पाकला ही कुरापत परवडणार नाही, असा इशारा भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिला.

ललकारणारे गप्प का? : काँग्रेस
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात मोदींनी बोलून दाखवलेले साहस कुठे गेले? निवडणुकीपूर्वी पाकला ते ललकारत होते. आता गप्प का?, अशा शब्दांत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी टीका केली.

तीन घुसखोर ठार
कुपवाडा जिल्ह्यात तंगधार सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या वेळी चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे तीन दहशतवादी मारले गेले. केरन सेक्टरमध्येही भारतीय जवानांनी तीन एके-४७ बंदुका जप्त केल्या.

प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ४ ठार, ३ जखमी
भारतानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि गोळीबार केला असा दावा करत पाकिस्ताननेच उलट्या बोंबा ठोकल्या. भारताने केलेल्या गोळीबारात ४ जण ठार तर ३ जण जखमी झाले आहेत, असे पाकने म्हटले आहे.