आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 January GSLVD 5 Take Off, Indian Space Research Organisation Give Green Signal

5 जानेवारीला झेपावणार जीएसएलव्हीडी-5 यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची प्रक्षेपणास संमती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंधनाचा वापर होणारे अंतराळयान जीएसएलव्हीडी-5 च्या प्रक्षेपणास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. पाच जानेवारी रोजी हे यान अवकाशात झेपावणार आहे. जीएसएलव्हीडी 5 च्या साहाय्याने दळणवळणाचा उपग्रह जी-सॅट 14 ही अंतराळात झेपावणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या अधिकारी मंडळाने प्रक्षेपणास शुक्रवारी संमती दिली.
प्रक्षेपणापूर्वी 29 तास आधी म्हणजे चार जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता उलटगणती सुरू होईल. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण होणार असून मंजुरी मिळाल्याने शनिवारी यानाला लाँच पॅडवर ठेवण्यात येणार आहे. इंधन गळतीमुळे गेल्या ऑगस्ट महिन्यात हे प्रक्षेपण स्थगित करण्यात आले होते.