आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे पोलिसांना पाहताच ट्रेनमधून मारली उडी; दुसऱ्या भरधाव एक्स्प्रेसखाली चिरडून 5 जण ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सवाई माधोपूर- राजस्थानातील सवाई माधोपूर रेल्वे स्टेशनवर रविवारी दुपारी विचित्र अपघात घडला. एका रेल्वेतून चुकीच्या दिशेने उतरलेले प्रवासी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव रेल्वेखाली चिरडले  गेले. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. प्राप्त माहितीनुसार,  हे सर्व जयपूर-बयाना रेल्वेतील प्रवासी होते. अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीररीत्या जखमी झाली. त्यांच्यापैकी एकाने रुग्णालयात उपचारावेळी अखेरचा श्वास घेतला. मृतांमध्ये एक जण मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील निवानिया कराल या गावचा होता. वैष्णव असे या प्रवाशाचे नाव होते, तर अन्य चौघे सवाई माधोपूर व करौली जिल्ह्याचे रहिवासी होते. जखमींवर उपचार सुरू असून, पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

अशी झाली घटना
सवाई माधोपूर रेल्वे स्टेशनवर दोन प्लॅटफॉर्म असून, त्यांच्या मध्ये फास्टट्रॅक आहे. यावरून रेल्वे विनाथांबा भरधाव जातात. रविवारी जयपूर-बयाना रेल्वे नियमित वेळेपेक्षा अडीच-तीन तास उशिराने सुमारे १२.१५ वाजता पहिल्या प्लॅटफॉर्मवर पोहोचली. त्यातील काही प्रवासी पहिल्या प्लॅटफॉर्मवर न उतरता चुकीच्या दिशेने फास्टट्रॅकवर उतरले आणि गांधीधाम-हावडा एक्स्प्रेसखाली आले.

यापूर्वीही घडल्या अशा घटना
मागच्या वर्षी सवाई माधोपूरमध्ये चौथच्या बारवाडामध्ये चौथामातेच्या यात्रेवेळी अशीच दु:खद घटना घडली होती. रुळावर बसून रेल्वेची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना एका रेल्वेने चिरडून टाकले होते.
बातम्या आणखी आहेत...