आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 मीटर खोल समुद्रात 5 सीईओंची 20 मिनिटे बैठक; जगातील पहिली अंडरवॉटर परिषद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम- हे छायाचित्र केरळचे प्रसिद्ध बीच कोवलमचे आहे. येथे सोमवारी पाच कंपन्यांच्या सीईओंनी सहा मीटर खोल पाण्यात परिषद भरवली होती. अशा पद्धतीची ही जगातील पहिली परिषद असल्याचा दावा करण्यात येत आहे. जलप्रदूषणाविषयी जनजागृती करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. २० मिनिटे चाललेल्या या परिषदेमध्ये सर्व कंपन्यांच्या प्रमुखांनी ‘मरीन लाइफ’च्या सुरक्षेसाठी जमेल ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. या अभियानाला त्यांनी ‘ओशन लव्ह’ असे नाव दिले आहे. यासाठी लवकरच एक क्लबदेखील बनवण्यात येणार आहे. 

या कंपन्यांच्या सीईओंचा समावेश   
उदया समुद्र ग्रुप ऑफ हॉटेलचे सीईओ राजा गोपाल अय्यर, टीसीएसचे दिनेश थाम्पी, यूएसटी ग्लोबलचे हेमा मेनन, नियोलॉजिक्सचे श्याम कुमार आणि  एवन मोबिलिटी सोल्युशनचे प्रमुख रॉनी थॉमस यांनी स्कूबा डायव्हिंग गिअर्स घालून ५० मीटर खोल असलेल्या तळावर ठेवण्यात आलेल्या “यू शेप्ड’ टेबलावर चर्चा केली.
बातम्या आणखी आहेत...