आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गंगापूर सिटी- अंधश्रद्धेपोटी एकाच कुटुंबातील 8 जणांनी विष घेतले. त्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार राजस्थानात उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले.
अधश्रद्धेला बळी पडलेले हे कुटुंब कंचन सिंह राजपूत यांचे आहे. ते स्वतः तंत्र-मंत्रात विश्वास ठेवायचे. सोमवारी रात्री त्यांनी कुटुंबियांसह शंकराची आराधना केली. शंकराने प्रत्यक्ष साक्षात्कार द्यावा, यासाठी राजपूत यांनी घरी यज्ञ केला. शिवलिंगावर रक्ताने अभिषेक केला. रक्ताचा टिका लावून यज्ञात अनेक वस्तुंची आहुती देण्यात आली. परंतु, तरीही शंकराने दर्शन दिले नाही. त्यामुळे विषयुक्त लाडू खाऊन संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. हेतू एकच. शंकर प्रगटले नाही. त्यामुळे आपणच त्याच्याकडे जाऊ, असा या सर्वांचा विचार होता. परंतु, कंचन सिंह राजपूत (45), त्याची पत्नी नीलम (40), मुलगी ड्रीमी (16), मुलगा प्रद्युम्न (11) आणि भाऊ दिप सिंह (40) यांचा या अघोरी कृत्यात मृत्यू झाला.
हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. या संपूर्ण घटनेचे चित्रिकरणही करण्यात आले आहे. राजपूत हे व्यवसायाने फोटोग्राफर होते. त्यांनीच घटनेचे रेकॉर्डिंग केले. कुटुंबातील प्रत्येकजण हसत हसत लाडवात विष मिसळताना तसेच ते लाडू खातना दिसत आहे. याशिवाय स्वतःच्या रक्ताने शंकराच्या प्रतिमेवर अभिषेक करणे तसेच यज्ञात आहुती देण्याचाही घटनाक्रम रेकॉर्ड झाला आहे. रक्त काढण्यासाठी इंजेक्शनच्या सिरिंजचा वापर करण्यात आला. या सिरिंजचा एक मोठा डबा चित्रिकरणात दिसून येत आहे.
कंचन सिंहचा भाचा संदीप काही वेळ या अघोरी यज्ञात उपस्थित होता. परंतु, महत्त्वाच्या कामानिमित्त तो दिल्लीला गेला. कंचन सिंह आणि त्याच्या पत्नीने संदीपला रेल्वेस्थानकावर सोडले. परंतु, या घटनेचा संशय त्याच्यावर येऊ नये, यासाठी त्याची ट्रेन सुटल्यानंतर सर्वांनी विषाचे लाडू खाल्ले.
या घटनेतून कंचन सिंहची आई भगवती, दीप सिंहचा मुलगा लव सिंह आणि भाची रश्मि बचावले. ते विषाच्या प्रभावामुळे बेशुद्ध झाले. रश्मिने शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना माहिती देऊन रुग्णवाहिकेला बोलावून घेतले आणि शेजा-यांनाही माहिती दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.