आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नक्षली हल्ल्यात ५ जवान जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंफाळ : मणिपूर-म्यानमार सीमेवर तैनात विशेष दलाचे पाच जवान शनिवारी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झाले. ही घटना आंतरराष्ट्रीय सीमेजवळील चंदेल जिल्ह्याच्या साजिक तंपकमध्ये घडली. सैनिक गस्तीवर असताना ही नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. नक्षलवाद्यांनी रिमोट कंट्रोलने एका बाँबस्फोट घडवला. त्याचबरोबर नक्षलींनी बंदुकीने देखील गोळीबार केला. त्याला सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर देखील दिले. दरम्यान, चंदेलच्या सुरक्षा तळांवर नक्षलवादी संघटनांकडून वारंवार हल्ले होत आले आहेत. जून २०१५ मध्ये देखील नक्षली हल्ला झाला होता. त्यात ८ जवान शहीद झाले होते. यावर्षी मेमध्ये झालेल्या हल्ल्यात ६ जवान शहीद झाले होते.
बातम्या आणखी आहेत...