आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या हॉटेलमध्ये चांदीचा बेड आणि सोन्याचा नळ, एका दिवसाचे भाडे 48 लाख रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - राजस्थानमध्ये असे अनेक हॉटेल आणि पॅलेस आहेत ज्यांनी आपल्या भव्य-दिव्यतेमुळे अनेक रेकॉर्ड केले आहेत. त्यापैकीच एक आहे जयपूरचे राज पॅलेस

राजस्थानमध्ये 19-20 नोव्हेंबर रोजी आयोजित रिसर्जेंट राजस्थान (आरआर) मध्ये देशातील 70 बडे उद्योजक घराणी आणि 500 हून अधिक उद्योगपती सहभागी होणार आहेत. या सर्वांसाठी लक्झरी हॉटेलचे 1500 रुम्स बुक करण्यात आल्या आहेत. यानिमीत्ताने divyamarathi.com सांगत आहे अशाच महालाबद्दल जे आता एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये रुपांतरित झाले असून त्यात सोन्याचे नळ लावण्यात आले आहेत.
एका दिवसाचे भाडे 48 लाख रुपये
जयपूरमधील या शाही पॅलेसमध्ये एक असा स्विट तयार होत आहे, ज्याचे एक दिवसाचे भाडे 48 लाख रुपये आहे. हा खास स्विट नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत तयार केला जाणार आहे. सध्या या पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्वात महागड्या रुमचे भाडे एका दिवसासाठी 7 लाख 20 हजार रुपये आहे. या स्विटमध्ये चार अपार्टमेंट आहे आणि पर्सनल एलिव्हेटर आहे. बेडरुममध्ये चांदीचा बेड आणि रेस्ट रुम मध्ये फेरारी कंपनीचे स्पेशल सोन्याचे नळ लावण्यात आलेले आहे. भिंतींना गोल्डन वर्क केलेले आहे.

एका पाहुण्यासाठी तैनात असतात 25 लोक
या शाही स्विटमध्ये डायनिंग एरियापासून किचनपर्यंत सर्वकाही पर्सनलाइज्ड आहे. पॅलेसमध्ये पोहोचल्यानंतर पाहुण्यांच्या त्यांच्या स्वागतात शाही रुक्के वाचले जातात, हत्ती-घोड्यांचा लवाजमा आणि रेड कार्पेट ट्रीटमेंटमुळे पाहुण्यांना विशेषत्वाची जाणीव होते. पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यासाठी 25 जणांची टीम तैनात असते. याशिवाय येथील स्पेशालिटी म्हणजे पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्पेशल शॅम्पेन बाथ असतो. या हॉटेलची एकही रुम एकसारखी नाही, ही देखील त्यांची खासियत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, चांदीच्या बेडसह 300 वर्षे जुन्या पॅलेसचा शाही थाट