आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 तरुणांनी कोर्टात दिली लश्करशी संबंध असल्याची कबुली, 5 वर्षांपूर्वी करण्यात आली होती अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपींची नावे मोहम्मद मुजम्मिल, मोहम्मद सादिक, मोहम्मद इलियास, मोहम्मद इरफान आणि मोहम्मद अकरम आहेत. - Divya Marathi
आरोपींची नावे मोहम्मद मुजम्मिल, मोहम्मद सादिक, मोहम्मद इलियास, मोहम्मद इरफान आणि मोहम्मद अकरम आहेत.
मुंबई - पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाशी संबंध ठेवल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या पाच तरुणांनी कोर्टत गुन्हा कबूल केला आहे. अँटी टेररिस्ट स्क्वॉड (एटीएस) ने त्यांना 2012 मध्ये नांदेडमधून अटक केली होती. हे सर्व काही हिंदू नेते आणि पत्रकारांच्या हत्येचा कट रचत होते, असा आरोप त्यांच्यावर होता. 

कोर्टात अर्ज करून दिली कबुली 
- आरोपींची नावे मोहम्मद मुजम्मिल, मोहम्मद सादिक, मोहम्मद इलियास, मोहम्मद इरफान आणि मोहम्मद अकरम आहे. 
- पांचही जणांनी सोमवारी मुंबईत स्पेशल एनआयए जज व्हीपी अव्हाड यांच्यासमोर अर्ज सादर ककत गुन्ह्याची कबुली दिली. 
- एटीएसने आरोपींकडून शस्त्रेही जप्त केली होती. नंतर प्रकरणाची चौकशी नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) कडे सोपवली होती. 
- तपास संस्थेने दावा केला की, आरोपी सौदी अरबमध्ये असलेल्या त्यांच्या म्होरक्याच्या इशाऱ्यावर नांदेड आणि हैदराबादच्या काही हिंदू नेत्यांची हत्या करणार होते. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. 
- न्यायालयाने आरोपींच्या विरोधात यूएपीए, आर्म्स अॅक्ट आणि आयपीसीच्या कलमांनुसार आरोप निश्चिती केली होती. 

का दिली कबुली?
आरोपींनी मॅक्सिमम पनिश्मेंटपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिले आहेत. त्यामुळे गुन्ह्याची कबुली दिल्यास त्यांना शिक्षा सुनावली जाऊ शकते असे आरोपींना वाटते. ती शिक्षा त्यांनी आधीच उपभोगली आहे. त्यामुळे लवकरच त्यांची सुटका होऊ शकते. प्रकरणाची पुढील सुनावणी 13 नोव्हेंबरला होईल. 

बचाव पक्षाच्या वकिलांची केसमधून माघार 
- बचाव पक्षाचे वकील शरीफ शेख यांच्या मते, या प्रकरणी आरोपींना जास्तीत जास्त जेवढी शिक्षा होऊ शकते तेवढी शिक्षा त्यांनी उपभोगली आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या मर्जीच्या विरोधात गुन्हा कबूल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही या केसमधून बाजुला झालो आहोत. 
- जमियत-ए-उलेमा, महाराष्ट्रच्या वतीने बाजू मांडणारे बचाव पक्षाचे आणखी एक वकील खान अब्दुल वहाब यांनी म्हटले की, आरोपी आमचे म्हणणे ऐकत नव्हते. त्यामुळे न्यायालयाच्या परवानगीने आम्ही माघार घेतली. 
 
बातम्या आणखी आहेत...