आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळा प्रयत्न: बिहारमधील मुंगेर येथे ५० देशांतील लोकांना दिले जाते योगाचे शिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंगेर (बिहार) - मुंगेर या मुदगल ऋषींच्या कर्मभूमीत बिहार योग भारती केंद्र आहे. ५२ वर्षांपूर्वीच्या या अध्यात्म आणि योग केंद्रात देशातील नागरिकांसोबतच ५० पेक्षा जास्त देशांतील लोक येतात.

या ठिकाणी लोकांना अध्यात्माचा आधुनिक जीवनशैलीत कशाप्रकारे अंगीकार करायचा हे शिकवले जाते. भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, सलमान खान, त्याची बहीण अलवीरा, अभिनेत्री रेखा यांच्यासोबतच योगगुरू बाबा रामदेव आणि अनेक उद्योगपतीही येथे येऊन गेले आहेत. येथील योग आणि अध्यात्म उपचारावर अनेक प्रकारचे प्रकल्प आणि संशोधनही तयार झाले आहेत. या प्रकल्पांचा आणि संशोधनांचा देश-विदेशातील अनेक प्रसिद्ध रुग्णालये, लष्कर आणि मोठमोठ्या कंपन्यांनी उपयोग केला आहे.

यात इंडियन ऑइल, एनटीपीसी आणि स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियासारख्या औद्योगिक संस्थांचा समावेश आहे. झारखंडच्या रिखिया संन्यास आश्रमापासून ते ऑस्ट्रेलिया आणि कोलंबियासारख्या ५० देशांत बिहार योग भारतीच्या शाखा आहेत.

ऋषिकेशच्या प्रेरणेने मुंगेर केंद्र
परमहंस सत्यानंद सरस्वती यांनी १९६४ मध्ये मुंगेरमध्ये गंगा नदीच्या तीरावर बिहार योग भारतीची स्थापना केली. १९२३ मध्ये जन्मलेले सत्यानंद सरस्वती मूळचे उत्तराखंडमधील अलमोडा येथील रहिवासी होते. वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांनी संन्यास घेतला. १९४३ मध्ये ऋषिकेशमध्ये स्वामी शिवानंद सरस्वती यांच्याशी त्यांची भेट झाली. १९४७ मध्ये स्वामी शिवानंद यांनी सत्यानंद सरस्वती यांना दिक्षा दिली. त्यानंतर स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी चीन, श्रीलंका, फ्रान्स, इटली, रशिया, जर्मनी आणि अफगाणिस्तानसोबतच अन्य ५० देशांमध्ये योगाचा प्रसार केला. त्यानंतर बिहार योग भारती आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना केली.