आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० हजार लोकांना ६८ वर्षांनी त्यांचा प्रदेश परत मिळाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कूच बिहार (प. बंगाल)- भारत व बांगलादेशातील लोकांसाठी शनिवार विशेष होता कारण शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून दोन्ही देशांदरम्यान नागरी वसाहतींची ऐतिहासिक अदलाबदलीची प्रक्रिया पूर्ण झाली. यामुळे जवळपास ५१, ५३९ लोकांना त्यांचा प्रदेश परत मिळाला आहे. गेल्या ६८ वर्षांपासून हे लोक कोणत्याच देशाचा हिस्सा नव्हते. ना भारताचे, ना बांगला देशाचे. आता त्यांनी त्यांच्या मर्जीनुसार देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे.
भारतात| ५१ बांगलादेशी वसाहतींमध्ये १४, ८५६ लोक राहतात. पैकी कुणीच बांगलादेशात गेले नाही।
बांगला देशात |१११ भारतीय वसाहतींमध्ये ३७, ३६९ लोक राहतात. त्यांच्यापैकी ९७९ लोक भारतात येणार आहेत. पैकी १६३ मुस्लिम आहेत.
>बांगला देशाला भारत १७,१६० हजार एकर तर बांगलादेश भारताला ७११० एकर जमीन देणार आहे.
१९७५ मध्ये झाला करार
सीमावर्ती भागात राहणा-यांच्या अदलाबदलीसाठी सर्वात आधी १९७५ मध्ये भारत - बांगलादेशादरम्यान करार झाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगला देश दौ-यात मोदी व बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात ढाका येथे ६ जून रोजी कागदपत्रांवर स्वाक्ष-या करण्यात आल्या. त्यानंतर कराराच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला.
बातम्या आणखी आहेत...