आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुरहाननंतर काश्मिरातील ५९ तरुण अतिरेकी : मुफ्ती, मेहबूबा यांनी दिली विधानसभेत माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- हिजबुलचा कमांडर बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीरमधील ५९ तरुण दहशतवादी कारवायांमध्ये सामील झाले. हे तरुण विविध दहशतवादी गटांत सामील झाल्याचे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. त्यांनी ही माहिती विधानसभेत दिली. आमदार मुबारक गुल यांच्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या. त्यांनी वानीच्या मृत्यूनंतर किती तरुण आतंकवादाकडे आेढले गेले असा प्रश्न केला होता. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याकडे राज्याचे गृहखातेदेखील आहे. त्यांनी विधानसभेत सांगितले की ८ जुलै रोजी वानी चकमकीत ठार झाला. त्याच्या मृत्यूनंतर अनेक काश्मिरी तरुणांनी दहशतवादाचा मार्ग निवडला. सीआयडीने जिल्हावार तरुणांची यादी बनवल्याचे त्यांनी सांगितले. 
 
दरम्यान, राज्यात आघाडी सरकार  स्थापन झाल्यानंतर हिंसाचार कमी होईल, असा दावा करणाऱ्या मेहबूबा आता मात्र काहीशा हतबल झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे विरोधकांनी त्यांना लक्ष्य केले आहे.चकमकीत लष्करचा दहशतवादी ठार झाला. सुरक्षा दलांनी मंगळवारी सकाळी बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे एका चकमकीत लष्करच्या एका अतिरेक्याला ठार केले. ठार झालेला अतिरेकी पाकिस्तानचा आहे. या वेळी त्याचा साथीदार पळ काढण्यात यशस्वी झाला. त्याच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अद्याप त्याचा माग काढण्यात यश आले नाही.  सैन्याला सकाळी सूचना मिळाली की सोपोरच्या तरजू गावातील हरितार येथे दोन दहशतवादी लपून बसले आहेत. यानंतर सैन्याची तुकडी येथे धाडण्यात आली. शोध पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. एक तास चकमक झाल्यानंतर एका दहशतवाद्याला ठार केले. यात संधी मिळताच त्याचा सहकारी पळून गेला. दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आलाय. त्याचे नाव अबू उमर खताब सांगण्यात आले. त्याच्याकडे एक रायफल, तीन काडतुसे व ग्रेनेड आढळले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...