आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत यूनिफॉर्ममध्ये न आल्याने 10 वर्षांच्या मुलीला बॉइज टॉयलेटमध्ये उभे राहाण्याची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलर ड्रेसमध्ये शाळेत आल्यामुळे मुलीला बॉइज टॉयलेटमध्ये उभे राहाण्याची शिक्षा दिली. - Divya Marathi
कलर ड्रेसमध्ये शाळेत आल्यामुळे मुलीला बॉइज टॉयलेटमध्ये उभे राहाण्याची शिक्षा दिली.
हैदराबाद - आंध्र प्रदेशातील हैदराबादमधील एका खासगी शाळेत सिव्हिल ड्रेसमध्ये आलेल्या 11 वर्षांच्या विद्यार्थीनीला टिचरने बॉइज टॉयलेटमध्ये उभे राहाण्याची अघोरी शिक्षा फर्मावली. यामुळे 5वीत शिकत असलेल्या मुलीला मोठा धक्का बसला असून तिने परत त्या शाळेत जाणार नसल्याचे म्हटले आहे. पालकांनी शाळा प्रशासनाकडे घडल्या प्रकाराची तक्रार केल्यानंतरही कोणतीही कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच गुडगावमध्ये 7 वर्षांच्या मुलाचा शाळेच्या टॉयलेटमध्ये मृतदेह आढळला होता तर, दिल्लीत 10 वर्षांच्या मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. 
 
शाळेत होणाऱ्या अत्याचारात वाढ... 
- गेल्या काही दिवसांमध्ये शाळेत होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचे वरील प्रकरणावरुन दिसून येत आहे. 
- हैदराबादमधील घटनेमध्ये पित्याचे म्हणणे आहे की त्यांनी मुलीने सांगितलेले सर्व मोबाइलमध्ये रेकॉर्ड करुन शाळा प्रशासनाला दाखवले मात्र त्यांनी आरोपी टिचरवर कारवाई केलेली नाही. 
- टिचरच्या घृणास्पद कृत्यानंतर मुलगी घाबरलेली आहे. तिने परत त्या शाळेत जाणार नसल्याचे म्हटले आहे. मी जर शाळेत गेले तर टिचर मला त्रास देतील आणि बेदम मारतील असे तिचे म्हणणे आहे. 
 
काय घडले मुलीसोबत... 
- पाचवीत शिकत असलेल्या मुलीने सांगितले, 'मी वर्गात जात होते, तेव्हा पायऱ्यावर असताना पीटी टिचरने मला पाहिले आणि बोलावून घेतले. सिव्हिल ड्रेसमध्ये शाळेत आल्यामुळे ते मला बोलायला लागले. मी त्यांना म्हटले तुम्ही माझी डायरी पाहून घ्या, मात्र त्यांनी माझे एक नाही ऐकले.'
- 'त्यावेळी तिथे आणखी दोन-तीन टिचर होते. ते म्हणाले स्कूल यूनिफॉर्म ऐवजी कलर ड्रेसमध्ये का आली. चला हिला बॉइज टॉयलेटमध्ये उभे करा तिथे सर्व मुलं हिला पाहात राहातील.'
- 'टिचरने मला बॉइज टॉयलेटमध्ये उभे राहायला सांगितले, मी साधारण पाच मिनिट तिथे उभी होते. त्यानंतर वर्गात गेले. सोशल स्टडीजच्या टीचरने माझी डायरी पाहिली. त्यावर आईने लिहून दिले होते की मुलीचा ड्रेस धुणे शक्य झाले नाही, त्यामुळे आजच्या दिवस तिला सिव्हिल ड्रेसमध्ये शाळेत बसू द्यावे. मात्र, शिक्षा सुनावणाऱ्या टिचरने डायरी न पाहाताच बॉइज टॉयलेटमध्ये मला उभे केले.'
 
हा लैंगिक अत्याचारच... 
- बाल लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते आचार्यालू राव यांनी हा बाल लैंगिक अत्याचारच असल्याचे म्हटले आहे. पीडित मुलीच्यापालकांनी त्यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. 
- आचार्यालू म्हमाले, हे प्रकरण पॉक्सो अॅक्ट अंतर्गत येणारे आहे. शाळेने संबंधित शिक्षकावर कडक कारवाई यासाठी आम्ही पोलिसांवर दबाव आणू. त्यासोबतच मानवाधिकार आयोगाकडेही या प्रकरणाची तक्रार करणार आहे.
बातम्या आणखी आहेत...