आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसारामाचे \'सुरक्षाचक्र\': 19 महिन्यांत सहा कोटींचा खर्च, प्रतिदिन 2 लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषणाचा आरोप असलेले स्वयंघोषित‍ अध्यात्मिक संत आसाराम बापुंची सुनावणी बुधवारी अखेर टळली. मध्यवर्ती तुरुंगात ही सुनावणी होणार होती. आसाराम यांनी या सुनावणीवर आक्षेप घेतला होता. परंतु, तो देखील कोर्टाने फेटाळून लावला.

आसाराम यांच्या सुनावणीवर 19 महिन्यांत सुमारे सहा कोटी रुपये खर्च झाले आहेत. दरम्यान, आसाराम यांच्या सुनावणीला त्यांचे अनुयायी कोर्ट परिसरात मोठी गर्दी करतात. त्यामुळे प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. आसाराम यांच्या सुरक्षेसाठी चार ठाण्याचे पोलिस प्रशासनाला तैनात करावे लागतात.

जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश मनोज कुमार व्यास यांनी आसाराम यांची याचिका फेटाळली. हायकोर्टाने प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार, या प्रकरणाची सुनवाणी मध्यवर्ती तुरुंगातच होईल, असेही न्यायाधीशांनी यावेळी सांगितले. यावेळी सरकारी वकील पोकरराम विश्नोई, पीडितेचे वकील प्रमोदकुमार वर्मा कोर्टात उपस्थित होते. परंतु आसाराम यांचे वकील महेश बोडा हे उपस्थित झाले नाही.

प्रमोदकुमार वर्मा यांचे सहाय्यक वकीलांनी तुरुंगात सुनावणी घेण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले होते. परंतु कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. तुरुंगात सुनावनी होऊ नये, असे या याचिकेत म्हटले होते. याचिकेवर पीडितेच्या वकीलांनी आक्षेप घेतला होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, आसाराम यांचे 'सुरक्षा चक्र'