आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 6 Killed In Hotel Building Collapse In Secunderabad

PHOTOS: सिकंदराबादमध्‍ये हॉटेलची इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्‍यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबादला लागूनच असलेल्‍या सिकंदराबाद भागात एका हॉटेलची दोन मजली इमारत आज (सोमवार) सकाळी कोसळली. या घटनेतील मृतकांचा आकडवा वाढून 11 वर गेला आहे. तसेच 16 जण जखमी झाले आहेत. यापैकी बहुतांश जण हॉटेलचेच कर्मचारी आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही इमारत 80 वर्षे जुनी असल्‍याची माहिती मिळाली आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, सिकंदराबाद भागातील आरपी रस्त्यावर असलेल्या सिटी लाईट हॉटलेची इमारत पहाटे 4.30 वाजताच्‍या सुमारास कोसळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्य सुरू असून हैदराबाद महापालिका आणि सीआयएसएफचे कर्मचारी बचावकार्यात गुंतलेले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्‍याची शक्‍यता आहे. हा भाग हॉटेलच्‍या स्‍वयंपाक घराचा आहे. अडकलेल्‍यांमध्‍ये हॉटेलचे कर्मचारी असण्‍याची शक्‍यता आहे. या परिसरात अनेक जुन्‍या मोडकळीस आलेल्‍या इमारती आहेत. त्‍यांना महापालिकेने नोटीस दिली आहे. सिटी लाईट हॉटेलचा त्‍यात समावेश होता का, याचा तपास करण्‍यात येत आहे.