चेन्नई: उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती सापडल्यामुळे बेंगलुरूच्या एका कोर्टाने 'एआयएडीएमके'च्या अध्यक्षा
जयललिता यांना दोषी ठरवल्यानंतर तब्बल 16 जणांनी आत्महत्या केली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील तीन जणांनी गळफास घेऊन, एकाने विष प्राशन करुन तर एकाने धावत्या बससमोर उडी मारून
आपला जीव दिला. इतर 10 जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन जणांनी पेटवून घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला असून या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एक बारावीत शिकत असलेला विद्यार्थी आहे. दुसरीकडे त्रिपूर येथील एका एआयएडीएमके समर्थकाने आपले बोट कापून घेतले.
जयललिता यांच्या विरूध्दचा आरोप सिध्द झाल्यानंतर विधानसभा सदस्यत्व रद्द झाले आहे. सोमवारी जयललिता यांचे निकटवर्तीय पनीरसेल्वम यांना तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्यात आले असून ते आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
पक्षाने केले अपील
एआयएडीएमके नेत्यांनी सांगितले की, लोकांचे असे वागणे हे जयललिता यांची लोकप्रिया दर्शवत आहे. सोशल वेलफेअर फंडचे चेअरमन आणि एआयएडीएमकेच्या महिला विंगच्या उपसचिव सी. आर. सरस्वती म्हणाल्या की, राज्यातील प्रत्येक जण जयललिता यांना आईप्रमाणेच मानतो. चाहत्यांनी, कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे कोणतेच पाऊल उचलून नये असे अपिल पक्षाच्या नेत्यांकडून केले आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, जयललितांच्या तुरूंगात जाण्याने भावनाविवश झालेले त्यांचे समर्थक आणि चाहते...