आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INSIDE STORY: हिमाचल प्रदेशात या 6 कारणांमुळे धूमल यांना बनवावे लागले CM कँडिडेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला - माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल हिमाचल प्रदेशात भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मतदानाच्या 98 दिवस आधी सिरमौरच्या राजगड येथे ही घोषमा केली. 2004 मध्येही प्रेम कुमार धूमल यांना मतदानाच्या 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्यामागे कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी दिलेला फिडबॅक हे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. राज्याच्या 68 जागांवर 9 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याचे निकाल 18 डिसेंबरला हाती येतील. 

या 6 कारणांमुळे अमित शहांनी घेतला निर्णय  
1) 70% धूमल आणि 30% नेते नड्‌डांच्या पाठिशी 

- प्रेम कुमार धूमल यांच्याशिवाय जेपी नड्डा यांचे नावही चर्चेत होते. त्यापूर्वी इंदू गोस्वामी यांच्याबाबतही चर्चा सुरू होत्या. नड्डा यांना राज्यात फारसा जनाधार नाही. ते फक्त बिलासपूर जिल्ह्यापर्यंत मर्यादीत आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले तर राजपूत समाज भाजपपासून दूर जात असल्याचे चित्र निर्माण होत होते. 
- सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचे 70% नेते प्रेम कुमार धूमल यांच्या पाठिशी आहेत तर नड्डा यांच्या पाठिशी फक्त 30% नेते आहेत. त्यामुळे जास्त पाठिंबा असल्याने धूमल यांचेच नाव निश्चित झाले. 

2) मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण याचे भाजप नेत्यांकडे नव्हते उत्तर?
- वीरभद्र यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून कांग्रेसने आघाडी घेतली होती. पण भाजपची भूमिका मात्र स्पष्ट नव्हती. वीरभद्र प्रत्येक सभेमध्ये याच मुद्द्यावरून भाजपवर हल्ला चढवत होते. केंद्रातून येणाऱ्या नेत्यांकडेही या प्रश्नाचे उत्तर नव्हते. त्यामुळे पक्ष बॅकफूटवर जात होता. 

3) भाजपकडे जनाधार असलेला नेताच नाही.. 
- धूमल यांच्याशिवाय राज्यात अशा एकही मोठा नेता नाही, ज्याच्यावर पक्ष विश्वास ठेवू शकेल. यापूर्वी प्रेम कुमार धूमल चार वेळा सीएम कँडिडेट म्हणून वीरभद्र सिंह यांच्यासमोर उभे ठाकले आहेत. 1998, 2003, 2007 आणि 2012 मध्येही हे दोघे आमनेसामने होते.  

4) कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नसल्याचे प्रचारात जाणवले, सभांनाही गर्दी नव्हती 
- धूमल यांनी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केले जात नसल्यामुळे त्यांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दिसत नव्हता. सभांमधूनही गर्दी कमी झाली होती. त्यामुळे भाजप पुन्हा आघाडीवर येण्यासाठी काय करता येईल याच्या प्रयत्नात होते. 

5) अमित शाहांना प्रेम कुमार धूमल यांच्या बाजुने मिळाला कौल.. 
-धूमल समर्थक मागणी करत होते की, निवडणूक जिंकण्याची असेल तर धूमल यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करावे. अमित शाहांनाही तसा रिपोर्ट मिळाला होता. सोमवारी रॅलींनंतर अमित शाहांनी शिमलाच्या सिसिल हॉटेलमध्ये मोठ्या नेत्यांची बैठक बोलावली. त्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याबाबत एकमत झाले. शाह यांनी मिटींगमध्ये एकच प्रश्न केला की, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणे गरजेचे आहे का? त्यावर काही नेत्यांनी सांगितले की, हिमाचलमध्ये विजय मिळवायचा असेल तर तसे करावेच लागेल. 

6) धूमल स्वतःच अनेक दिवस घरात बसून होत 
प्रेम कुमार धूमल यांना जेव्हा हमीरपूरऐवजी सुजानपूरहून लढण्यास सांगितले तेव्हा त्यांनी पक्षाचा निर्णय मान्य केला. पण नाराज समर्थक प्रचारासाठी घरातून बाहेर निघायला तयार नव्हते. स्वत: धूमलही अनेक दिवस घरातच होते. 
 
पुढे वाचा, हिमाचल प्रदेशातील स्थिती आणि धूमल यांच्याबाबत...

 
बातम्या आणखी आहेत...