आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैलास मानसरोवर यात्रेचे साठ कि. मी. अंतर घटणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुंजी (उत्तराखंड, भारत-नेपाळ सीमा) - भारतवासियांची अपार श्रद्धा असलेल्या चीनमधील कैलास मानसरोवर यात्रेचे अंतर साठ कि. मी. ने घटणार आहे. हिमालयाच्या दूर्गम डोंगररांगा लहरी हवामानात पायी कराव्या लागणा-या खडतर प्रवासातून मोठा दिलासा मिळणार आहे. तेरा ते चौदा हजार फुट ऊंचावरील गुंजी, कालापानी, नाभिडांग परिसरातील चार पुलांचे काम अंतिम टप्यात आहे. भारतीय सैन्यदलाच्या सीमा सडक संघटन संस्थेच्या अंगिकृत ग्रेफ (जनरल रिझर्व इंजिनिअर फोर्स) विभागामार्फत कैलास मान सरोवर मार्गावरील पुलांचे काम सुरू असून अडीच महिन्यात या हलकी वाहने धाऊ लागतील.

मागील पाच वर्षांपासून कैलास मानसरोवर यात्रामार्ग व आदी कैलास अशा दोन्हींचे स्थळांचे भाग्य ग्रेप या सैन्याच्या विभागामार्फत उजळायला प्रारंभ झाला आहे. भारतीयांच्या आस्थेचा विषय समजल्या जाणा-या दोन यात्रा जूनमध्ये सुरू होतात. कैलास मानसरोवर यात्रा चीनमध्ये असून, आदि कैलास यात्रा भारत चीन सिमेवर असली तरी संपूर्णत: भारतात आहे.

कैलासमानसरोवर यात्रा: भारताच्या विदेश मंत्रालयामार्फत कैलास मानसरोवर यात्रेचे संचालन केले जाते. दिल्ली येथून वाहनाने यात्रेस प्रारंभ होतो. कुमाऊ मंडळ विकास निगम संस्था यात्रेकरूंना भारतीय हद्दीत निवा-याची व वैद्यकीय मदत पुरविते. इंडो तिबेट बॉर्डर पोलिस या भारतीय निमलष्करी दलाची यात्रेला भारतीय हद्दीपर्यंत सुरक्षा दिली जाते. यात्रेकरूंची दिल्ली, धारचूला, गुंजी व भारत चीन सीमेवरील लिपुपास येथे वैद्यकीय तपासणी केली जाते. लिपुपासच्या पुढे चीनचे प्रशासन यात्रेचे संचालन करते.

चिनमध्ये यात्रेकरूंनी प्रवेश केल्यानंतर तकलाकोट या व्यापारी पेठेत पहिला मुक्काम असतो. लिपुपासपर्यंत चिनने दुहेरीमार्ग तयार केला आहे. येथून यात्रेकरूंना बसमध्ये बसवून केलासमानसरोवराच्या दर्शनासाठी नेले जाते.
दोन महिन्यात गाड्या धावणार
मनुष्यबळाअभावी कामास विलंब होत आहे. ढिगारे उचलण्यासाठी कामगार मिळत नाही. गुंजी येथील पुलाचे काम आठ दिवसात तर कालापाणी येथील पुल जुलैअखेर खुला होईल. पंधरा ते अठरा टन वजन वाहून नेण्याची पुलांची क्षमता आहे. दोन महिन्यात कैलासमानसरोवर यात्रेकरूंचे येण्या जाण्याचे अंतर साठ कि. मी. ने कमी होईल.
मेजर मनिष नारायण कार्यकारी अभियंता ग्रेफ धारचूला.