आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 वर्षांपासून नातेवाइकांची सरकारे, या वेळी आप पाहुणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - येथेे कुटुंबांच्या राजकारणाचा वारसा  आहे. फक्त ६ घराणी अन् तीही आपसातच कुठल्या ना कुठल्या प्रकारे नातेवाईकच असलेली. या राज्यात - प्रदेशात यांचेच राज्य राहिलेले आहे. पहिल्यांदाच आम आदमी पार्टीच्या रूपात काही आणखी घराणी या निवडणूक मैदानात सहभागी होण्याच्या तयारीत आहेत. ज्यास घेऊन येथे कोणतीही दीर्घ चर्चा करणे योग्य होणार नाही. असो. पंजाबमध्ये भाई-भतिजावाल्या राजकारणाला दिग्गजांनी राजकारणाच्या क्षितिजावर उदय होण्याची एक कला बनवून टाकले आहे. राजकारणातील या वारशाला हे रथी-महारथी हा एक नैतिक-भ्रष्टाचार   आहे असे बिलकूलच मानत नाहीत. आता आपण प्रदेशातील ५ विशेष कुटुंबांतील राजकारणातील मजेशीर युती कशी आहे ते वानगीदाखल पाहूयात.  अशातच एका मुलाखतीच्या दरम्यान उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांनी नात्यांमध्ये अापलेपणातील या जाणिवेची गरमी अनुभवताना इतरांना सांगितले की, जेव्हा केव्हा ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी भेटतात तेव्हा त्यांचे चरणस्पर्श करतात. यावर कॅप्टन यांनीही खास पंजाबी लकबीत शैलीत  उत्तर दिले की, जेव्हा सुखबीर जेलमध्ये होते तेव्हा त्यांना डाएट-कोक जरूर मिळाले. मीच त्यांना याबाबत आश्वस्त केले होते. 
 
नातेसंबंधाचा हा तक्ता : कॅप्टनचे नातेसंबंध बराड कुटुंबाशी, बराड यांचे कैरोंशी आणि कैरोंचे बादल कुटुंबीयांशी
 
प्रदेशातील राजकारणावर पकड असलेल्या सहा घराण्यांची स्थिती कोणत्याही कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्ससारखीच आहे. पद मुख्यमंत्र्यांचे असो वा विरोधी पक्षनेत्यांचे. अशामध्ये या राज्यातील राजकारणाचे आकलन खूपच गुंतागुंतीचे आहे.
 
सुरुवात करूयात ढिल्लो कुटुंबीयांपासून, जे आता बादल या नावाने ओळखले जातात. पाच वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले प्रकाशसिंग बादल यांचे पुत्र सुखबीर अमेरिकेतून परततात न परतत तोच ते संसद सदस्य आणि नंतर केंद्रीय मंत्री झाले. मोठ्या बदलांनी त्यांच्यासाठी दोन योजना बनविल्या. प्लॅन ‘ए’मध्ये त्यांनी १९९९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली, पण ते पराभूत झाले. असो. प्लॅन ‘बी’ नुसार त्यांना राज्यसभेत पाठविले गेले. प्रकाशसिंग बादल यांचे भाऊ गुरुदास बादल संसद सदस्य आणि  आमदार लोकप्रतिनिधी होते. त्यांचे पुत्र मनप्रीत अमेरिकेतून शिक्षण घेऊन परतले तेव्हा काका प्रकाशसिंग यांनी त्याला तिकीट दिले. ते जिंकले आणि अर्थमंत्री झाले. मोठ्या बादलांची सुकन्या परनीत यांचा विवाह राज्याचे पहिले मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरो यांचे नातू आदेश प्रताप यांच्याशी झाला. आदेशला राजकारणातील भेट म्हणून शिअद येथून तिकीट मिळाले आणि सासरच्या नेतृत्वातील सरकारात ते मंत्री झाले. मोठे कैरोंचे भाऊ जसवंत यांची मुलगी गुरुविंदर यांचा काँग्रेस प्रदेश प्रमुख हरचरणसिंग बराड यांच्याशी विवाह झाला. ते मुख्यमंत्री बियांतसिंग यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री झाले. 
 
 
पतियाळाचे शाही घराणे आणि मान 
माजी मुख्यमंत्री बराड यांचे पुत्र सन्नी बराड आणि कॅप्टन अमरिंदर यांचे लहान भाऊ मालविंदर यांचा विवाह सख्ख्या बहिणींशी झाला आहे. साडूभाऊवाली जोडी कॅप्टन अमरिंदर आणि शिअद-अमृतसर येथील संगरूरचे संसद सदस्य सिमरनजितसिंग मान यांची आहे. दोघांचे विवाह पंजाबचे माजी मुख्य सचिव ज्ञानसिंग कहलो यांची मुलगी परनीत आणि गीतइंदर यांच्याशी झाला आहे. दोघेही राजकारणात सक्रिय आहेत. 
 
बादल आणि मजिठिया कुटुंबाचे नातेसंबंध 
प्रकाशसिंग बादल यांचे पुत्र सुखबीर यांचा विवाह हरसिमरत यांच्याशी झाला. त्या सत्यजित मजिठिया यांच्या कन्या आहेत. त्यांचे भाऊ विक्रम कॅबिनेट मंत्री आहेत. त्याचे काका हरराजसिंग यांचे पुत्र परमजित ढिल्लो ऊर्फ लाली बादल हे आहेत. ते पंजाब पब्लिक सर्व्हिस कमिशनचे सदस्य आहेत. दुसरे काका गुरराजसिंग यांचे पुत्र भूपिंदरसिंग ढिल्लो १९९७ ते २००२ पर्यंत सीएम बादल यांचे सचिव होते.
बातम्या आणखी आहेत...