आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटारसीत मानवी तस्करी, रेल्वेतून ६१ मुले ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटारसी - रक्सौल येथून मंुबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसला निघालेल्या जनसाधारण एक्स्प्रेसच्या तीन डब्यांमधून रविवारी रात्री १० वाजता इटारसी जंक्शनवर ६१ मुले ताब्यात घेण्यात आली. ही सर्व मुले बिहारची असून, त्यांना बालमजुरी करण्यासाठी नाशिक आणिa मुंबईला पाठवले जात होते. मुलांना शोधण्यासाठी रेल्वे ३५ मिनिटे रोखण्यात आली. ठेकेदाराच्या तीन एजंटांनी सांगितले की, महाराष्ट्रात टमाट्यांची लोडिंग करण्यासाठी या मुलांना ५-६ हजार रुपये मजुरी देऊन नेले जात आहे. या सर्व मुलांचे वय १० ते १८ वर्षे आहे.

चाइल्डलाइनद्वारे यासंदर्भात सूचना मिळाली होती. त्यानंतर जीआरपी दल, आरपीएफचे श्वानपथक आणि चाइल्डलाइनचे पथक रेल्वे येण्याआधीच प्लॅटफॉर्मवर तैनात होते. पोलिसांनी ठेकेदाराच्या तीन एजंटांना अटक केली आहे. मो. नियाज अहमद, मनदीप प्रसाद चौधरी आणि किशन मुसहर अशी त्यांची नावे आहेत.
बातम्या आणखी आहेत...