आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाय कमकुवत असल्याने टेनिस शिकवण्यास नकार, स्केटिंगमध्ये जिंकली 62 पदके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर/भोपाळ/रायपूर- जागतिक बाल दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने ३ बालकांच्या प्रेरणादायी कथा आपल्यासाठी आणल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या तिघांना बालदिनी (१४ नोव्हेंबर) सन्मानित केले. उदयपूरची लब्धी सुराणाला खेळ, भोपाळच्या ऋषभ गर्ग व रायपूरच्या श्रेष्ठ अग्रवालला सृजनशीलतेसाठी रौप्यपदक प्रदान झाले. लब्धीने स्केटिंगमध्ये तिच्या वयाच्या ९ पट जास्त पदके जिंकली आहेत.   

 

लब्धी सुराणा : ४ वर्षांत जिंकली ६२ पदके  
 पाय आणि मांड्या कमकुवत असल्याचे सांगत प्रशिक्षकाने लब्धीला धावायला सांगितले. पालकांनी स्केटिंग शिकवणे सुरू केले. ७ व्या वर्षीच लब्धीने रोलर स्केटिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ४ आणि राष्ट्रीय स्पर्धेत ६ सुवर्णपदकांसह ६२ पदके जिंकली आहेत. 

 

ऋ षभ गर्ग :  ‘का’ आणि ‘कसे’चे उत्तर शोधायचा  
ऋषभने २० अंकी स्मार्ट आयडी डिजिटल सर्व्हिलान्स सिस्टिम बनवली. स्पाय कार, १० लाख वर्षांची दिनदर्शिका बनवण्याच्या नासाच्या प्रकल्पात ऋषभ कार्यरत आहे. गोल्डन बुक ऑफ वर्ल्डमध्येही त्याची नोंद आहे.  

 

श्रेष्ठ अग्रवाल: अमेरिकेतही मिळवले पुरस्कार  
शिकण्याच्या प्रयत्नात बालपणी श्रेष्ठ रिमोट, खेळण्यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खोलून टाकायचा.  डेंग्यू, मलेरियासारखे आजार रोखण्यासाठी त्याने अॅप बनवले आहे. अमेरिकेने या अॅपला तृतीय पुरस्काराने गौरवले.  

बातम्या आणखी आहेत...