आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

62 वर्षांची अखंड मैत्री, 35 वर्षांपासून एकाच घरात वास्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर (राजस्थान) - वय आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर मैत्री बदलते. परंतु जोधपूरमधील दोन बुजुर्गांची मैत्री अगदी ‘ही दोस्ती तुटायची नाय ’ अशाच धाटणीची म्हणावी लागेल. त्यांची 62 वर्षांपासूनची मैत्री आहे. हे नाते खूप प्रगाढ आहे. सुरुवातीला एकत्र व्यवसाय केला नंतर दोघेही एकाच छताखाली राहू लागले. गेल्या 35 वर्षांपासून दोन्ही कुटुंबे एकाच घरात असून एवढ्या वर्षानंतरही त्यांचे मैत्र दूध-साखरेसारखे मधुर आहे.

दोघेही तरुण वयापर्यंत सोबत शिकले आणि यातून त्यांच्यात जिवलग मैत्री झाली. 1954 मध्ये दोघांनी मिळून एमएमव्ही रेकॉर्ड करण्याचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय आणि घर बदलत राहिले. परंतु 80 वर्षांचे ठाकूरदास आणि त्यांच्याहून एक वर्षाने धाकटे असलेले श्यामसुंदर यांची मैत्री दृढ होत गेली. आता तर त्यांना जोडगोळी म्हणून ओळखले जाते.

अर्धे-अर्धे पैसे देऊन घर बांधले
सुमारे 35 वर्षांपूर्वी मूळ शहर सोडून बाहेरच्या भागात घर बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि 12 हजार 500 रुपयांत एक प्लॉट खरेदी केला. त्यासाठी दोघांनी अर्ध्या-अर्ध्या पैशांच्या भागीदारी केली. त्यानंतर घराचे बांधकाम करण्यात आले. या घराचे मुख्यद्वार एकच आहे. परंतु आत वेगवेगळे भाग आहेत. दोन्हीमध्ये एक दरवाजा आहे. जो चोवीस तास खुला असतो. दोघेही आपल्या कुटुंबातच राहतात.

विवाहदेखील एकाच दिवशी
श्यामसुंदर यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. ठाकूरदास यांना दोन मुले आहेत. श्यामसुंदर यांना तीन भाऊदेखील आहेत. परंतु ते भावांऐवजी मित्रासोबत राहू लागले आहेत. दोन्ही मित्रांचा विवाहदेखील एकाच दिवशी झाला होता. विवाहानंतर दोन्ही मित्रांनी एक सारखेच कपडे घालत. पत्नींसाठीदेखील सारखीच साडी आणत. दहा वर्षांपूर्वी ठाकूरदास यांच्या पत्नीचे निधन झाले आहे.

व्यवसायात विश्वास कायम
व्यवसायात अनेक उतार-चढाव आले. परंतु दोघांतील विश्वास मात्र कायम राहिला. सध्या दोघे कृषी उत्पादन आणि खाद्याचा व्यवसाय करत आहेत. एकाने धनादेशावर स्वाक्षरी केली तर दुसरा त्याकडे पुन्हा पाहणारदेखील नाही. व्यवसायात दोघांची मुलेही हीच परंपरा चालवताना दिसतात.