आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 64 Dead Body Found In Uttarakhand Flood Incident

उत्तराखंडातील महासंकटाच्या घटनेनंतर 64 मृतदेह आणखी सापडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - उत्तराखंडच्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेशातील पर्वत शिखर भागात मोठ्या कालखंडानंतर 64 मृतदेह सापडले. काही दिवसांपासून प्रदेशातील हवामान अनुकूल असल्यामुळे बचावकार्याला वेग आला होता. मृतदेहांवर धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.


जून महिन्यातील नैसर्गिक संकटानंतर जीव वाचवण्यासाठी पर्वत शिखरावर गेलेल्या भाविकांचे हे मृतदेह असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. शिखरावर अति थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यात मात्र त्यांना यश आले नसावे, असे पोलिस महासंचालक आर. एस. मीना यांनी सांगितले. रामबाडा व केदारनाथ यांच्यादरम्यान गेल्या दोन दिवसांपासून या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. वातावरण चांगले राहिल्यामुळे नव्याने शोधमोहिमेला सुरुवात झाली.


अगोदर वातावरण खराब असल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली होती; परंतु हवामान असेच अनुकूल राहिले तर आणखी काही दिवस पर्वत शिखरांवरील शोधमोहिमेला गती देता येऊ शकेल. विशेषत: जंगलचट्टी, रामबाडा, गौरीगाव, भीमबली इत्यादी प्रदेशांत मृतदेहांचा शोध घेण्यात येणार आहे. दुसरीकडे 11 सप्टेंबर रोजी केदारनाथ मंदिरात प्रार्थनेसाठी परवानगी देण्यात आली आहे.