आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्‍ये मुस्लिम कैद्यांसोबत ६५ हिंदूंचाही रोजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरनगर - उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील तुरुंगात धार्मिक सौहार्दाचे वातावरण कायम ठेवत १,१५० मुस्लिम कैद्यांसोबत ६५ हून अधिक हिंदू कैद्यांनीही रोजा ठेवला आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधिकारी सतीश त्रिपाठी म्हणाले की, पवित्र रमजान महिन्याच्या पहिल्या दिवशी ६५ हिंदू कैद्यांनीही मुस्लिम कैद्यांसोबत रोजा ठेवला. तुरुंगात कैद्यांना नमाज पढण्याबरोबरच सहरी आणि इफ्तारची खास सोय करण्यात आली आहे. कैद्यांना हंगामी फळे, सुका मेवा आणि ५०० ग्राम दुधाबरोबरच फराळाचे अन्य पदार्थही उपलब्ध करून दिले जात आहेत.
बातम्या आणखी आहेत...